राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा..
“खरे तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे,या साने गुरुजींच्या कवितेतील ओळीचा सार समाजात वावरताना,सण, उत्सव साजरे करताना आपल्या आचरणात आणावे व सण शांततेत साजरे करावे.
कुरखेडा येथे शांतता समीती सभा प्रसंगी नवनियुक्त उपविभागीय अधिकारी (महसुल) रंजीत यादव यांचे आवाहन..
भारत हा देश उत्सव प्रिय संस्कृती प्रधान देश असून या देशात सर्व धर्मातील अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
सण,उत्सव साजरे करताना प्रत्येक नागरिकाने “साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे,या कवितेतील ओळीचा सार समजून घेत समाजात वावरताना,सण उत्सव शांततेत साजरे करा असे आवाहन नवनियुक्त उपविभागीय अधिकारी रंजीत यादव यांनी केले.
ते आज कुरखेडा तहसील कार्यालयाच्या सभागृहात पोलीस विभागाच्या वतीने आयोजित शांतता बैठकी प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
शांतता समितीच्या सभेचे प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार रमेश कुंभरे, ठाणेदार महेंद्र वाघ,गट विकास अधिकारी धीरज पाटील,नायब तहसीलदार राजकुमार धनबाते,वीज वितरण केंद्र कुरखेडाचे उपकार्यकारी अभियंता मिथुन मुरकुटे,वैद्यकीय अधीक्षक अमित ठमके,तालुका कृषी अधिकारी संजय रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.
शांतता समिती सभेचे आयोजक कुरखेडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र वाघ यांनी प्रास्ताविक करताना आपली परंपरा सर्वधर्म समभावाची असून त्याचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे,त्यामुळे प्रत्येक मंडळचे ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण असावे,सोशल मीडियावर अफवा पसरू नये,परीक्षा कालावधी असल्याने ध्वनिक्षेपकाच आवाज कमी ठेवावे.
सोशल मीडियावर सामाजिक सलोखा बिघडविनाऱ्यावर व धार्मिक भावना भडकविणाऱ्या पोस्ट व्हायरल करु नका,मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी,मद्यप्राशन किंवा धिंगाणा करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे म्हटले.
याप्रसंगी नायब तहसीलदार राजकुमार धनबाते,गटविकास अधिकारी धीरज पाटील,वैद्यकीय अधीक्षक अमित ठुमके,कृषी अधिकारी संजय रामटेके,विद्युत अभियंता मिथुन मुरकुटे,पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आव्हाड, शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, पोलीस पाटील नंदेश्वर यांनी शांतता बैठकी प्रसंगी उपस्थित असलेले तालुक्यातून आलेले शेकडो शारदा दुर्गा उत्सव मंडळातील पदाधिकारी पोलीस पाटील,सरपंच उपसरपंच,नगरसेवक यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र सोनकुकरा सर यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोबें यांनी मानले.
शांतता सभेत कुरखेडा तालुक्यातील सर्व सरपंच,पोलीस पाटील,पत्रकार बंधू,तंटामुक्त समितीचे पदाधिकारी,दुर्गा व शारदा मंडळाचे पदाधिकारी,शहरातील प्रतिष्ठित नागरिक,व महीला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
शांतता समिती सभेच्या यशस्वीतेसाठी कुरखेडा पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.