दर्यापूर जिनिंग प्रेसिंगची आमसभा वादाच्या भोवऱ्यात, आमसभा रद्द करण्याची मनसेची मागणी…

युवराज डोंगरे/खल्लार 

        उपसंपादक

     मागच्या एक महिन्या आधीच शेतकरी सहकारी जिनिंग विक्रीचा लिलाव करण्याचे प्रयत्न शेतकरी सहकारी जिनिंगचे सत्ताधारी व सत्तेतील मंडळी यांनी केला होता सदर लिलाव बंद पाडत त्यांचा डाव मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हानुन पाडला होता.

           त्यामुळे सदर संस्थेची चोरून आमला येथे दिनांक २७/०९/२०२४ ला आमसभा असल्याचे काही भागधारकांना कळले. संचालक मंडळाच्या घरी जाऊ गुपचूप मध्ये आमसभेच्या नोटीस वर सहया घेण्यात आल्या सदर सहया घेत असताना तिथे भाग भांडवलदार संचालकाच्या घरी काही कामानिमित्त हजर असल्यामुळे त्यांना ही माहिती झाली.

           सदर संस्थेमध्ये एकुण ६००० भागधारक होते कोणतीही नोटीस व कारण नसताना व्यवस्थापक व आज रोजीच्या सत्ताधारी मंडळींनी सदर भाग भांडवलदाराचे मतदार यादीतून नाव कमी करून आपल्या मर्जीतील नातेवाईक व मित्रमंडळी यांना भाग भांडवलदार करून सदर निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती.

          संस्थेमध्ये काहीही शिल्लक नसताना निवडणूक एवढी प्रतिष्ठेची का असा प्रश्न तेव्हाच दर्यापुरातील जनतेला पडलेला होता त्याचे खरे रूप आता पाहायला मिळालेले आहे संस्थेची शेवटची शिल्लक असलेली शिवर रोडवरील १ हेक्टर ८२ आर जमीन विक्री करून मालामाल होऊन आपले राजीनामे द्यावे व आपणच भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांचे नेते व कैवारी असल्याचे मिरवावे.

           या संस्थेमध्ये विद्यमान खासदार व दर्यापुरातील प्रतिष्ठित नेते मंडळी भागधारक आहेत ते या प्रकरणाकडे लक्ष देतील काॽ आता विधानसभेकरिता दर्यापूर मतदारसंघात बाशिंग बांधून असलेले उमेदवार बोलत आहे की आम्ही नवीन प्रकल्प दर्यापूर मध्ये आणणार सदर शेतकऱ्याची संस्था विक्री होत असताना याकडे यांचे लक्ष का नाही फक्त थापा सदर अवैद्य होऊ घातलेली आमसभा रद्द करून सदर संस्थेचे जुने भांडवलदार व नवीन भाग भांडवलदार यांची यादी प्रसिद्ध करून नव्याने आमसभा घेऊन सदर शेत विक्रीचा प्रस्ताव दर्यापूर या तालुक्याच्या ठिकाणी घ्यावा या बाबतीचे निवेदन मनसेचे तालुकाध्यक्ष मनोज तायडे तसेच काही भाग भांडवलदार यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक,जिल्हा सहनिबंधक, तसेच तहसीलदार व सहाय्यक निबंधक दर्यापूर यांच्याकडे निवेदन सादर केलेले आहे यावर प्रशासन व दर्यापुरातील नेते मंडळी काय भूमिका घेणार यांच्याकडे सर्व दर्यापुरातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.