केळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पार्वतीताई म्हस्के यांची बिनविरोध निवड…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक

आळंदी : केळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी पार्वती शंकर म्हस्के यांची बिनविरोध निवड झाली आहे. केळगाव ग्रामपंचायतीचे मावळत्या उपसरपंच लता रघुनाथ वीरकर यांनी त्यांच्या पदाचा ठरविलेला कार्यकाल पूर्ण झाल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. 

           गुरुवारी (दि. 26 सप्टेंबर) ग्रामपंचायत कार्यालय केळगाव येथे रिक्त उपसरपंच पदासाठी विशेष सभा बोलावून निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी सभा अध्यक्षस्थानी सरपंच गुंफाबाई ठाकर या होत्या. यावेळी विहित मुदतेत उपसरपंच पदासाठी पार्वती शंकर म्हस्के यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्यांची उपसरपंच म्हणून निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी निवडणूक सहाय्यक म्हणून ग्रामसेवक नीना रासकर यांनी काम पाहिले. 

           यावेळी मावळत्या उपसरपंच लता वीरकर तसेच ग्रामपंचायत सदस्य किरण मुंगसे, अक्षय मुंगसे, दत्तात्रय मुंगसे, ज्योती वहीले, सुधीर वहीले, रुपाली मुंगसे, नामदेव मुंगसे आदी उपस्थित होते. पार्वती म्हस्के यांना निवडीनंतर उपस्थितांनी शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला.

               तसेच म्हस्के यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत भंडाऱ्याची उधळण केली.‘गावासाठी विविध योजना व विकासकामे तसेच गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार,’ अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपसरपंच पार्वती म्हस्के यांनी दिली.