आळंदीतील भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक तुतारी फुकणार का…?

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका लवकरच होणार असुन पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात सुध्दा निवडणुकीचे वातावरण तापत असून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) दिलीप मोहीते पाटील आमदार असुन हा मतदार संघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस कडेच राहणार असून त्यामुळे सत्तेतील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांनी लोकसभेपुर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असुन येणाऱ्या निवडणूकीत विधानसभेची उमेदवारीसाठी अतुल देशमुख हे प्रबळ दावदेर आहेत आणि बहुतेक त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी आशा आहे.

          अतुल देशमुख यांचा आळंदी शहरात चांगला प्रभाव असुन अनेक भाजपचे पदाधिकारी व माजी नगरसेवक त्यांच्या कायम संपर्कात असतात त्यामुळे ते अगामी विधानसभेत अतुल देशमुख यांच्या प्रेमापोटी तुतारी वाजवतील असे बोलले जात आहे.

          अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 2016च्या आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली. हि सत्ता आणण्यात अतुल देशमुख यांचा मोठा असुन त्यांचा शब्द पक्षाच्या नगरसेवकांनी कधीही खाली पढू दिला नाही. ते म्हणतील तसेच काम पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक करत होते.

           पण अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्याने खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळू शकणार नाही. अतुल देशमुख हे भाजपकडून विधानसभेच्या तयारीत होते. राज्यातील सत्ता नाट्यामुळे खेड-आळंदी विधानसभा मतदार संघ भाजपला मिळू शकणार नाही. त्यामुळेच त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लोकसभेपुर्वीच प्रवेश केला.

          त्यांच्या प्रवेशानंतर त्यांनी लोकसभा निवडणूकीत त्यांची ताकद दाखवत अमोल कोल्हे यांना मतदार संघात लीड देऊन त्यांच्या विजयात महत्वाची भुमिका बजावली होती.