ब्रेकिंग न्युज… –अल्पवयीन मुलीवर बळजबरी, दर्यापूर पोलिसात पोस्कोचा गुन्हा दाखल, आरोपी गजाआड…. — अचलपूर न्यायालयाने आरोपीस ठोठावला तीन दिवसाचा पीसीआर…

युवराज डोंगरे /खल्लार 

         उपसंपादक

          दर्यापूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दर्यापूर-अंजनगाव रोडस्थीत बाँर अँड रेस्टारंटवर एका युवकाने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून नेले व बळजबरी (अत्याचार) केला. दरम्यान या प्रकरणी पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन सोमवारी रात्री उशीरा विविध कलमांसह पोस्कोचा एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संतापजनक घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

         रोशन अरुण पळसपगार (वय.25) रा.खानापूर हिंगणी ता.जि.अकोला असे मंगळवारी पहाटे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दर्यापूर पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार आरोपी रोशन याने दि.21 सप्टेंबर रोजी दुपारी ओळखीतील अल्पवयीन मुलीस फुस लावत दुचाकीवर बस फीरुन येवू असे म्हणत थेट दर्यापुर शहराबाहेरील अंजनगाव रोडस्थीत दामीनी बाँर अँड रेस्टॉरंटवर आणले व तेथील एका खोलीत जबरदस्तीने अत्याचार केला.

           दर्यापूर पोलिसांनी अटकेतील आरोपी रोशन पळसपपगार यास मंगळवारी अचलपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात न्यायालयात हजर केले असता आरोपीस न्यायालयाने तीन दिवसाचा म्हणजेच दि.26 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

           घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गुरुनाथ नायडू,ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुलभा राऊत करीत आहे. घटनेतील सदर बाँर अँड रेस्टॉरंट एका राजकीय व्यक्तीचे असल्याने पोलिस प्रशासन पुढील कारवाई काय करणार ? याबाबत चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.