कराडी येथे रस्ते, नाल्यांसह गावाची केली साफसफाई… — महात्मा फुले विद्यालयाचा उपक्रम…

      अश्विन बोदेले 

जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

          दखल न्यूज भारत 

आरमोरी : महात्मा फुले विद्यालय कराडीच्या वतीने स्वच्छता पंधरवाडा निमित्त स्वच्छता हीच सेवा अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गावामध्ये स्वच्छता रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रस्ते, नाल्यांसह गावाची साफसफाई केली.

             याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गावातील रस्ते, मुख्य चौक, समाज मंदिर, बसस्टॉप येथील कचरा, घाण याची साफसफाई करत स्वच्छतेविषयी जनजागृती केली. रॅलीमध्ये मुख्याध्यापक अजय गेडाम, शिक्षक परमानंद मेश्राम, कैलास सोनबावने , गोपाल कुमरे, देवदास कवाडकर, महेश राऊत, मनोज रामटेके, राजू वालदे, खुशाल ढोक यांच्यासह विध्यार्थी सहभागी झाले होते.

           यावेळी शालेय स्तरावर टाकाऊपासून टिकाऊ वस्तु तयार करणे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी अनेक टाकाऊ वस्तूपासून सुंदर कलाकृती सादर केल्या. यामध्ये भाविक उईके याच्या कलाकृतीला प्रथम क्रमांक, दिव्यानी कुमरे हिचा द्वितीय क्रमांक, तर प्रणाली कुमरे हिने तृतीय क्रमांका पटकाविला.