जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे आळंदीत जलसमाधी आंदोलन.‌‌….

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : अंतरवाली सराटी (जि.जालना) येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मराठा आरक्षणासाठी शासनाच्या वेळकाढूपणाच्या निषेधार्थ आळंदीतील सकल मराठा समाजबांधवांनी बुधवारी (ता.25) आळंदी येथील इंद्रायणी नदीत जलसमाधी आंदोलन केले.

        या आंदोलन प्रसंगी डि.डि.भोसले, रोहिदास तापकीर, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, आनंदराव मुंगसे, प्रकाश कुऱ्हाडे, उत्तमराव गोगावले, अरुणराव कुरे, शशीराजे जाधव, श्रीकांत काकडे तसेच आंदोलनात शहरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

          मागील काही दिवसांपासून मराठा योद्धा जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण व सगेसोयरे अध्यादेश काढावा या मागणीसाठी आमरण उपोषण करत असुन त्यासाठी मागील अनेक वर्षांपासून उपोषणे, आंदोलने करून त्यांची प्रकृती क्षीण झाली. सरकार उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याने मराठा समाजामध्ये सरकार विरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे. जोपर्यंत सरकार मराठा समाजाच्या व जरांगे पाटील यांच्या मागण्या तत्वतः मान्य करत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन चालूच राहणार असल्याचे आंदोलकाच्या वतीने सांगण्यात आले.

       सरकारने लवकर सरकारने सगेसोयरे कायद्याची अमंलबजावणी करावी, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी यासह इतर मागण्या मराठा समाजाच्या वतीने करत जोरदार घोषणा देण्यात आल्या आंदोलनस्थळी आळंदी पोलिस स्टेशनचे अधिकारी यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.