युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांनी तळोधी(बा.) येथील स्व.नामदेव दोडकु मांढरे यांचे कुटुंबांची सांत्वनपर भेट घेऊन केली आर्थिक मदत…!

प्रमोद राऊत /तालुका प्रतिनिधी 

        नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील स्व.नामदेवजी दोडकु मांढरे हे २ दिवसांपूर्वीच स्वर्गवासी झाले. त्यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. यांची माहीती युवा काँग्रेस कार्यकर्ते जिवनभाऊ निकेसर यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते, गोर-गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे दिवाकर निकुरे यांना दिली.

 

      दिवाकर निकुरे तळोधी दौऱ्यावर आले असता त्यांनी लगेच कार्यकर्त्यांसमवेत मांढरे परिवारची भेट घेऊन सांत्वन करून त्यांना आर्थिक मदत केली.

         या वेळेस त्यांच्यासोबत 

प्रदेश युवक काँग्रेस सहसचिव नितीन कटारे, सावरगाव ग्रा.पं. सरपंच रविंद्र निकुरे, जिल्हा युवक काँग्रेस महासचिव गौतम पाटील, सागर खोब्रागडे, ओबीसी विभागाचे तालुका अध्यक्ष संजय अगडे, युवा काँग्रेस कार्यकर्ते जिवन निकेसर, संतोष बोडने, श्रेयश शेनमारे, श्याम बागडे, लोकेश मेश्राम, अक्षय चौधरी, वैभव कोरे तसेच इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.