राष्ट्रीय सेवा योजना सामाजिक बांधिलकीचे बळकडू देते :-डॉ.शुभांगी वडस्कर…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि  

चिमूर :-  स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 55 वा वर्धापन दिन संपन्न करण्यात आला.

        या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.शुभांगी वडस्कर प्राचार्या, आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर ह्या होत्या. त्यानी आपल्या मार्गदर्शनात रासेयो स्वयंसेवक विद्यार्थ्यांना सांगितले की,राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थी घडतो. एक विद्यार्थी घडला तर कुटूंब,समाज,देश घडण्यास मदत होते.गाव खेड्याची उन्नती होते.

          मतदान जनजागृती, श्रमदान, अंधश्रद्धा निर्मूलन,समाज प्रबोधन करण्याचे सर्व धडे राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये दिले जाते. सेवा योजनेमुळे जीवन जगण्याला बळ प्राप्त होते. विद्यार्थी कोणत्याही संकटमय परिस्थितीला शरण जात नाही. ही राष्ट्रीय सेवा योजनेची किमया आहे. सामाजिक संस्काराचे बाळकडू फक्त राष्ट्रीय सेवा योजनेत मिळते.असे मत व्यक्त केले.

            या प्रसंगी हूमेश्वर आनंदे कार्यकारी प्राचार्य,ग्रामगीता महाविद्यालय यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, यावे ज्ञानासाठी जावे सेवेसाठी हे तत्व राष्ट्रीय सेवा योजनेतूनच विद्यार्थ्यांना प्राप्त होते. शिक्षणाबरोबर सेवा आणि व्यक्तिमत्व विकास करणे काळाची गरज आहे.व्यक्तिमत्व विकासामुळेच समाजाचा विकास होतो.राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यानी देशकार्यात सहभागी व्हावे.

          कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की,राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे विद्यार्थी सर्वगुणसंपन्न बनविणारी कार्यशाळा आहे. रा से यो विद्यार्थी कोणत्याही परिस्थिती ला तोंड देतो. समाजाचा व देशाच्या उन्नतीचा प्रगतीचा जर कोणता मार्ग असेल तो मार्ग म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना होय. कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गुणवंत वाघमारे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून राष्ट्रीय सेवा योजनेचा पूर्ण इतिहास तथा उदिष्टे सांगितले.

           कार्यक्रमाला डॉ.कार्तिक पाटील,डॉ हरेश गजभिये, प्रा पितांबर पिसे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राकेश कुमरे डॉ. राजेश्वर राहांगडाले डॉ. उदय मेंडुलकर उपस्थित होते. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रफुल राजुरवाडे यांनी केले. आभार डॉ नितिन कत्रोजवार यांनी केले. ५५ व्या रासेयो ५ ५ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.राष्ट्रवंदने नी कार्यक्रमाची सांगता झाली.