लोकाभिमुख प्रशासकीय पद्धती महत्वाची :- प्रा.अविनाश कोल्हे… — पुण्यात ‘संविधान अभ्यास वर्ग’ ला चांगला प्रतिसाद…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : भारत जोडो अभियान आणि संविधान प्रचारक लोकचळवळ यांच्या वतीने सोमवार,दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता ,एस.एम.जोशी फाउंडेशनचा कॉन्फरन्स हॉल येथे संविधान अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

            या अभ्यास वर्गामध्ये राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे यांनी ‘संघ आणि राज्य लोकसेवा आयोग : काल,आज ,उद्या’ या विषयावर मार्गदर्शन केले.’हा अभ्यास वर्ग सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य होता. भारत जोडो अभियानाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक आणि संविधान प्रचारक संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. 

           समाजवादी पक्षाचे विनायक लांबे यांच्या हस्ते प्रा.कोल्हे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. संविधान प्रचारक निलम पंडित यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यावेळी वाचन संस्कृतीचा प्रसार करणारे अशोक सुलाखे यांचा जनता दलाचे प्रकाश डोमळे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.शाहीर बाबासाहेब. जाधव यांच्या गीतांने कार्यक्रमाची सांगता झाली.

            प्रा.कोल्हे म्हणाले, ‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र वल्लभभाई पटेल यांनी इंग्रजांचे हुकूम गाजविणारे आणि त्यांच्या मर्जीनुसार चालणारी प्रशासकीय पद्धती बंद केली आणि नवीन संघ आणि राज्य लोकसेवा आयोगाची, लोकाभिमुख प्रशासकीय पद्धती अवलंबली, आणि तुम्ही जनतेचे सेवक आहात, तेंव्हा न घाबरता, लोकशाहीसाठी काम करावे असे सांगितले.

           म्हणूनच वल्लभभाई पटेल यांना आधुनिक भारतीय नोकरशाहीचे जनक मानले जाते.भारतासारख्या बलाढ्य देशावर राज्य करण्यासाठी व्यावसायिक प्रशासकांची आवश्यकता असल्याचे लक्षात आल्याने लॉर्ड कॉर्नवॉलिस, मेकॉले आदींनी प्रयत्न केले, आणि भारतातीलच हुशार लोकांना आणि अर्थातच युरोपियन ज्ञानी लोकांनाही प्रशिक्षित करून व्यावसायिक प्रशासक नेमणे सुरू केले, अशा प्रकारे प्रशासकीय अधिकारी नेमण्यासाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी मेकॉले यांनी पुढे केली.

            अशा प्रशासकांना राजकीय नेत्यांनी स्वतःच्या निवडणूक जिंकण्यासाठी काही लोक अनुनय करून निर्णय घ्यायला लावू नये म्हणून त्यांना कायदेशीर संरक्षणही देण्यात आले’, अशी माहिती प्रा.अविनाश कोल्हे यांनी यावेळी दिली.