अज्ञात पिकअप व दुचाकीची समोरा-समोर धडक.. — पारडपार गावाजवळी घटना..  — गंभीर अपघातातंर्गत बर्जाबाई मेश्राम यांचा मृत्यू तर दोघे गंभीर,दोघांचे दोन्ही पाय मोडले.. — फरार पिकअप वाहनचालकास जेरबंद करण्याचे भिसी पोलिसांसमोर आव्हान,मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणे आवश्यक…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

        चिमूर तालुक्यातील भिसी येथील रोहित राजू गेडाम वय 20 वर्ष,रितिका राजू गेडाम वय 19 वर्ष,पारडपार येथील बर्जाबाई मेश्राम वय 70 वर्ष रा.पारडपार हे तिघेही दुचाकीने आज 1 वाजताच्या दरम्यान मौजा भिसी वरून मौजा मोटेगाव येथील दवाखान्यात जात असताना पारडपार गावाजवळील फाट्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात पिकअप ने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले होते. 

        दरम्यान तिन्ही जखमीना भाजपा पदाधिकारी तथा मागंलगावचे सरपंच प्रफुल कोलते यांनी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे आणले असता डाॅक्टरानी गंभीर जखमी असल्यामुळे त्याना नागपूरला उपचारार्थ हलविण्यात आले.

          या दरम्यान आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी तात्काळ औषधोपचारासाठी आर्थिक मदत केली. 

        यावेळी भाजपा युवा मोर्च्याचे चिमूर शहर अध्यक्ष बंटी वनकर,श्रेयस लाखे,सागर भागवतकर,अमित जुमडे,निखिल भुते यांनी उपस्थित राहून मदत कार्य केले.

          तिन्ही गंभीर जखमींना नागपूर येथे नेत असताना वाटेतच बर्जाबाई मेश्राम यांचा मृत्यू झाला.घटनेचा पुढील तपास भिसी पोलीस करीत आहे.

         मात्र,अपघाताचा प्रकार हा गंभीर असल्याने अपघात करणाऱ्या पिकअप चालकास जेरबंद करण्याचे आवाहन भिती पोलिसांसमोर आहे.याचबरोबर अपघात करणाऱ्या पिकअप चालकांवर इतर कलमांसह मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांचे आहे.