कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
२० सप्टेंबरच्या रात्री दरम्यान पारशिवनी पोलीस स्टेशन तसेच तहसील कार्यालय पारशिवनी येथील पथकातील प्रमुख,पो.स्टे.परिसरात अवैधरीत्या रेती उत्खनन करणाऱ्यांची माहिती काढत असता बातमीदाराकडून माहिती मिळाली कि,” पो.स्टे. परिसरातील सालई (माहुली) शिवारातील पेंच नदीच्या पात्रातून अवैध रेतीचे उत्खनन करून रेतीची साठवणूक केली जात आहे.
यावरून मिळालेल्या माहिती प्रमाणे व वरिष्ठांचे आदेशाने महसूल खात्याचे कर्मचारी व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी पेंच नदीच्या काठावरील कास्तकार नामे आंनदराव संतोष झोड व इतर कास्तकारांचे शेत जे येरखेडा कामठी येथील शोएब असद यांनी विकत घेतले असून सदर शेतात पेंच नदीच्या पात्रातून अवैधरित्या उत्खनन करून शेतात साठवणूक केलेल्या अंदाजे ४०० ब्रास रेती साठा दिसून आल्याने तो साठा तसेच रेतीचे उत्खनन व साठवणूक करण्यासाठी वापरलेले त्याच परिसरात मिळून आलेले एकून चार १० चाकी टिप्पर ट्रक व दोन एस्केवेटर मशीन असा एकुण १ कोटी ०६ लाख २० हजार रुपयाचा माल पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला.
सालई (माहुली) येथील तलाठी यांनी दिलेल्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन पारशिवनी येथे आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे.
सदर कार्यवाही ही पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण श्री. हर्ष पोद्दार,अपर पोलीस अधिक्षक श्री.रमेश धुमाळ,उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग श्री. रमेश बरकते,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन,पारशिवनीचे ठाणेदार राजेशकुमार थोरात,पोउपनि शिवाजी भताने,स.फौ.देवानंद उकेबोंद्र,पोहवा/मुदस्सर जमाल, मंगेश ढबाले,सुरेश धुर्वे,पोअं/राहुल तभाने,विरेंद्रसिंग चौधरी,राकेश बंधाटे,पृथ्वीराज चौव्हान,चालक संजय देशमुख यांचे तसेच महसुल खात्याचे तलाठी विश्वजीत पुरकाम,गणेश चव्हान,कृष्णा माने,जमील शेख यांचे पथकाने संयुक्त केली.