ब्रेकिंग न्यूज… — भरदिवसा मुख्य चौकात झाडाला फाशी घेऊन युवकाची आत्महत्या… — साकोली न्यायालय चौकातील घटना ; पोलीसांची तातडीने धाव…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली :- शहरातील मुख्य न्यायालय चौकातच एका युवकाने रोडवरच झाडाला दोर बांधून फाशी घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवार २१ ला सायं. ५ वा. घडली. जनतेने आरडाओरड केली आणि तातडीने साकोली पोलीस घटनास्थळी धावून आले.

           शहरातील लाखांदूर रोड टि पॉईंट गोवर्धन चौकात बालोद्यान आहे. लागूनच करंजीच्या झाडावर सायं. ०४:४५ दरम्यान मांगली/किटाडी तह. लाखनी येथील उमेश सुर्यभान वाघाडे वय अंदाजे ३८ वर्ष हे झाडावर चढून एका लागलेल्या बैनरच्या लाकडी चौकटीला दोर गळ्यात अडकवित फाशी घेतली.

           ही घटना चालत्या राज्य महामार्गावरच झाली आणि तेथील जनतेने एकच आरडाओरडा सुरू केली. याची माहिती होताच साकोली पोलीस ठाणे निरीक्षक संजय गायकवाड यांच्या सुचनेने पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडूले हे घटनास्थळी दाखल झाले. मृतकाचे शव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

         सदर मृतक इसम हे साकोली काही कामानिमित्त आले होते असा अंदाज आहे. मृतकाने घटनास्थळी झाडाखाली एक कापडी पिशवी आणि चप्पल काढून ठेवली होती. ही घटना कळताच बाजूलाच न्यायालयातील वकील मंडळींनी येथे धाव घेतली. या आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही. पण अचानक मुख्य आणि रहदारी चौकातच सर्वांच्या समोर एक इसमाने फाशी लावल्याची ही साकोली शहरातील पहिलीच घटना आहे.

          उमेश सुर्यभान वाघाडे यांचे लग्न २०१७ मध्ये झाले होते. ते मानसिक आजारी होते. ते आपल्या बहिणीकडे सेंदूरवाफा येथे काही दिवसांपूर्वी आले होते. त्यांना मुले बाळे नव्हते.

           याविषयी पोलीसांना अधिक माहिती देतावेळी सामाजिक कार्यकर्ता अविनाश ब्राह्मणकर, विजया ठाकरे, विनायक देशमुख, ॲड. बालगोविंद गुप्ता, ॲड. अनिल पटले आदी घटनास्थळी होते. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडूले करीत आहेत.