जे.एस.पी.एम. महाविद्यालयात आभासी पद्धतीने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून उद्घाटन… 

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

         व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील 1000 नामांकित महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

        यात गडचिरोली जिल्ह्यातील 13 केंद्राचा समावेश असून त्या धानोरा येथील जीएसटी महाविद्यालयाचा समावेश आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून आभासी पद्धतीने यावेळी मंचावर महाराष्ट्राचे राज्यपाल केंद्रीय मंत्री जितन राम मांझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार मंगल प्रभात लोढा मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता तसेच इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.

        आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र मार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून एका वर्षात दीड लाख युवक युवतींना प्रशिक्षण मिळणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

         जे.एस.पी.एम.महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक प्राध्यापक डॉ.सचिन धवनकर यांच्या नेतृत्वात तर प्रभारी प्राचार्य डॉ.पंकज चव्हाण यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या सभागृहात उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या उद्घाटन सोहळ्याला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक पत्रकार शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.