बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील अण्णासाहेब काळे यांची शिंदे गट शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली.
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे यांच्या आदेशा नुसार शिवसेना पुणे उपजिल्हा प्रमुख या पदाची नियुक्ती करण्यात आली.या प्रसंगी जिल्हा प्रमुख महेशदादा पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली अण्णासाहेब काळे यांची निवड करून त्यांना निवडीचे पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना महिला पुणे जिल्हा प्रमुख सीमाताई कल्याणकर, इंदापूर तालुकाप्रमुख रामचंद्र जामदार, शिवसेना इंदापूर शहर प्रमुख शुभम भैय्या जामदार, विजय पवार, राजाभाऊ जानकर, धनंजय पवार, रूपचंद बापू जाधव, आशोक देवकर, विशाल धुमाळ, इत्यादी उपस्थितीत होते .
अण्णासाहेब काळे नियुक्ती प्रसंगी बोलताना म्हणाले की मी स्वतः पक्षाशी एकनिष्ठवंत राहीन व पक्षाला कुठलेही गालबोट लागणार नाही याची तटस्थ जबाबदारी घेईन व इंदापूर तालुक्यात शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करेन. इंदापुर तालुक्यात गाव तिथे शाखा हे माझे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि धाडसी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी नेहमीच प्रयत्न राहीन.
वंदनीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंदरावजी दिघे यांची शिकवण हि डोळ्यासमोर ठेवून पक्षाशी एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पुढे काम करीत राहीन निवडी प्रसंगी उपजिल्हाप्रमुख अण्णासाहेब काळे बोलत होते.