समर्थ महाविद्यालयात ओझोन दिवस साजरा…

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा 

          राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली 17 सप्टेंबर 2024 रोज मंगळवारला जागतिक ओझोन दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

          पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी ओझोनचे काय महत्त्व आहे व ओझोन लेअर टिकवण्यासाठी वृक्ष लागवड करणे व प्रदूषण मुक्त वातावरण तयार करणे काळाची गरज आहे जर प्रदूषण मुक्त वातावरण तयार झाले नाही. तर भविष्यात त्वचेचे कर्करोग डोळ्याचे मोतीबिंदू व इतर आरोग्य विषयक समस्या निर्माण होतील व त्या निर्माण होऊ नयेत.

            याकरिता व त्या कशा प्रतिबंधित करता येतील यासाठी अधिकाधिक झाडे लावणे रासायनिक पदार्थांचा वापर कमी करणे अत्यंत आवश्यक आहे असे मार्गदर्शन भूगोल विभागात कार्यरत असलेल्या प्रा. स्वाती नवले व विज्ञान शाखेतील रसायनशास्त्रात कार्यरत असलेल्या प्रा. शितल कोमेजवार यांनी केले.

          जागतिक ओझोन दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना ओझोन थर जतन करणे आणि हवामान बदल कमी करण्याच्या दुहेरी फायद्यांबद्दल शिक्षित करणे व ओझोन विषयी जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

          या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षिकेतर कर्मचारी वरिष्ठ लिपिक प्रणय भांडारकर संस्कृत विभागात कार्यरत असलेल्या प्रा.रुपाली खेडीकर व गृह अर्थशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या प्रा. प्रतिभा वंजारी , विज्ञान विभागातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.भाष्कर पर्वते प्रामुख्याने उपस्थित होते.

          तसेच कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.