ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली : तालुक्यातील आमगाव/ बुज येथे भूमि अभिलेख विभागातर्फे 70 नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालय येथे घराचे पट्टे वाटप करण्यात आले.
आमगाव येथील नागरिकांना घराचे पट्टे अजून पर्यंत मिळाले नव्हते अनेक दिवसापासून घराचे पट्टे मिळावे म्हणून नागरिकांनी पाठपुरावा केला अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
70 लाभार्थी घराचे मालक झाले. घराचे पट्टे मिळण्याची समस्या याकडे शासनाने लक्ष देऊन दिनांक 13/ 9 /2024 ला ग्रामपंचायत मध्ये घराचे पट्ट्याच्या वाटप करण्यात आले. भुमी अभिलेख विभागातर्फे पट्ट्याचे महत्त्व सांगण्यात आले.
सर्व नागरिकांनी सरकारचे आभार मानले याप्रसंगी आमगावचे सरपंच फालावती शहारे, उपसरपंच शहारे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर कामगते, ग्रामपंचायत सदस्या अनु बोरकर, मनीषा कापगते तसेच भूमि अभिलेखचे फुलबांधे व खुळसुंगे उपस्थित होते.