१७ सप्टेंबर हा दिन ‘मराठवाडा मुक्ती दिन’ म्हणून संपूर्ण मराठवाड्यात मोठ्या उल्हासात साजरा करीत आहोत. कारण हा दिवस मराठवाड्यासाठी एक ‘स्वातंत्र्य दिन’च होय.या स्वातंत्र्यसंग्रामाची नोंद इतिहासाने घेतलेली आहे.
या स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास समजून सविस्तररितीने समजून घेवू.
प्रथम महाराष्ट्रात मराठवाड्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे.मग मराठवाडा हि कसा तयारी झाला.आणि इथे निजाम शाही कशी आली, हे पहाणे तितकेच महत्त्वाचे आहे.
मराठवाड्याचा इतिहास पहाण्यासाठी सम्राट अशोकाच्या कालखंडात जावे लागेल. सम्राट अशोकाच्या १६ महाजनपदा पैकी दोन महाजनपदे गोदावरीच्या होते. एक अश्मक आणिदुसरे मुलक हे होत. तेंव्हा तेथील लोक महाराष्ट्री प्राकृत बोलणारी होती. सातवाहन राजा हाल यांनी ७०० गाथा एकत्र करुन ‘गाथाशप्तशती’ ची निर्मिती केली. ती प्राकृतमधून असलेली निर्मिती मानली जाते. विशेष यामध्ये गोदावरी खोऱ्यातील लोकांचे लोकजीवन प्रतिबिंबीत केले आहे. त्याकाळी बोलीभाषेवरुन तो प्रदेश ओळखण्याची पध्दत होती.
जसे तेलगू (आंध्र),कन्नड (कर्नाटक) तसा मराठी (मराठवाडा) होय.
पुढे अनेकांनी येथे आपली हुकूमत गाजवली.आणि १७२४ मध्ये निजाम उल मुल्क याने हैदराबाद या संस्थानात आपली सत्ता स्थापन केली. यानंतर सातवा आणि शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान २९ ऑगस्ट १९११ रोजी सत्तेवर आला. तो खुप महत्त्वाकांक्षी होता. पहिल्या महायुद्धात निजामाने इंग्रजांना मदत केली. त्यावेळी एक बक्षीस म्हणून ब्रिटीश सम्राट पाचवा जॉर्ज ह्याने निजामाला’ हिज एक्झाल्टेड हायनेसस’हा किताब बहाल केला. इस्लामी राज्य स्थापन करण्याची त्याची इच्छा होती. त्यावेळी तेथील राजभाषा फारसी होती.त्याच्याच काळात १९१७ मध्ये उस्मानिया विद्यापीठाची स्थापना झाली.हैदराबाद राज्यात ११टक्के मुस्लिम लोकसंख्या होती. १७२४ ते १७४८ एकूण २४ वर्ष ही कारकीर्द राहीली.त्यानंतर निजामाच्या वारसदारांमध्ये १७४८ ते १७६२पर्यंत वारसायुद्ध घडून आले.निजाम उल मुल्क नंतर त्याचा मुलगा निजाम अली हा हैदराबादचा संस्थानाचा सत्ताधिपती झाला.त्याने स्वतःला निजाम ही पदवी धारण केली.त्या संस्थानात निजामशाही सुरु झाली.
स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात ५६५ संस्थाने होती. त्यापैकीच निजामा हैद्राबाद हे एक होय. हे संस्थान सर्वात मोठे संस्थान होते. यामध्ये एकूण एक कोटी ७६ लाख लोकसंख्या होती. म्हणजेच या संस्थानाने सध्याचे तेलंगणा, आंध्रप्रदेशचे सहा जिल्हे, कर्नाटकचे सहा जिल्हे आणि मराठवाड्याच्या आठ जिल्ह्याचा समावेश होता. तर निजामाची दहा टक्के भूमीवर खाजगी मालकी होती.
ब्रिटिशांनी संस्थानिकांना आपली संस्थाने स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्याची परवानगी दिली होती. बँ.जीना यांनी फाळणी करुन पाकिस्तान निर्माण केले.त्या पाठोपाठ निजामानेही आपले संस्थान ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून घोषित केले.
त्यावेळी १५ ऑगस्ट १९४७ भारत देश स्वतंत्र राष्ट्र झाला. लगेच सर्व संस्थाने भारतात विलीन होत गेले.पण फक्त तीन संस्थाने काश्मीर,जुनागढ आणि हैद्राबाद ही भारतात विलीन होण्यास तयार नव्हते. त्यात हैद्राबाद हे भारताच्या मध्यवर्ती भागात असून ते भारतात विलीन होणे गरजेचे होते. आणि मराठवाड्याचा जास्त भाग हैद्राबाद संस्थानाने व्यापला होता. विलीनीकरण टाळण्यासाठी शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान याने कासीम रिझवीच्या नेतृत्वाखाली ऐक क्रुर अर्धसैनिक दल स्थापन केले. या दलास रझाकार असे नाव होते. रझाकार म्हणजे स्वयंसेवक असा अर्थ होतो. तेथील हुकूमशाही राजवटीत या रझाकार दलाचने अराजकता माजवली होती. जनतेला अत्याचार, जुलूम करून कर्याची परिसिमा गाठली होती. याची तुलना हिटलरच्या नाझी सैन्याशी केली जाते.
या सामाजिक अन्याय, दहशतीच्या वातावरणाने जनतेमध्ये उग्रता वाढली. लोकांच्या मनात असंतोष वाढत गेला. या अवस्थित स्वातंत्र्याच्या मार्गावर पावले टाकीत होती. ह्या स्वातंत्र्यासाठी अनेक सत्याग्रह, जन आंदोलने, विद्यार्थी आंदोलने, विविध संघटनांनी यात उडी घेतली. तर या लढयात स्त्रियांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवला होता. सत्याग्रहींच्या सर्व तुकड्यांमध्ये मराठवाड्यातील तरुन आघाडीवरहोते. त्यात गोविंदभाई श्रॉफ, माणिकचंद पहाडे, बाबासाहेब परांजपे, पुरुषोत्तम चपळगावकर, कर्वे गुरुजी यांनी कुशलतेने सत्याग्रहीचे संघटन केले. मराठवाड्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तिर्थ यांच्याकडे होते.हा स्वातंत्र्यसंग्राम गावागात पोहोचला होता. तो कोण्याएका जातीपुरता राहिला नव्हता. तर प्रत्येकाच्या अस्मितेचा होता. आपल्या जीवाची पर्वा न करत स्वातंत्र्यवीर पुढे आले. औरंगाबाद जिल्ह्यातील भाऊराव भिमाजी मतसागर,बदनापूर तालुक्यातील दगडाबाई शेळके, लातूरचे हरिश्चंद्र जाधव, बीडचे विठ्ठलराव काटकर, नांदेडचे देवराव कवळे, विठ्ठलराव जोंधळे, हिंगोलीचे चंद्रकांत पाटील गोरेगावकर, बहिर्जी शिंदे वापटीकर, दिपाजी पाटील दातीकर इत्यादीने सशस्त्र लढ्यात सहभाग नोंदविला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनने सुद्धा या लढ्यास पाठिंबा दिला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यातील दलित, वंचित घटकांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. निजाम विरोधी पहिली जाहीर परिषद ३० डिसेंबर १९३८ मक्रणपूर ता.कन्नड जिल्हा औरंगाबाद येथे झाली. हि परिषद हैद्राबाद स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्त्वाचा क्षण होता. स्वातंत्र्यसेनानी व शेड्युल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष भाऊसाहेब मोरे हे होते. त्यांनी एक पत्रक काढले त्यात ते म्हणतात, निजामची पदच्युती व्हावी, लोकशाहीवर आधारलेली पध्दतीवर आधारलेली जबाबदारलोकशाही राज्यपध्दती निर्माण झाली पाहिजे, हे आंबेडकरी अनुयायांनी लक्षात घ्यावे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
हैद्राबाद मधील दलितांनी जो निजाम उघड उघड हिंदूस्थानचा शत्रू आहे, म्हणून त्याची बाजू घेऊन समाजाच्या तोंडाला काळीमा लावू नये.यावर दलितांनी निजामविरोधात स्वतःला झोकून घेतले.शेड्यूल कास्ट फेडरेशनने निजामाला विरोध दर्शविला.
याच मक्रणपूर मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषनापूर्वी भाऊसाहेबांनी ‘जयभीम’ चा पहिला नारा दिला.
१२ सप्टेंबरच्या मध्ये रात्री म्हणजे १.३०वाजता भारतीय सैन्य हैद्राबादर संस्थानात सोलापूर- नळदुर्ग, मनमा-औरंगाबाद, जालना-हिंगोली,चांदा-अदिलाबाद-बेजवाडा,वरंगल-नलगोंडा,रायपूर-होहोसपेट मार्गे घुसले.
हैद्राबाद संस्थानावर भारत सरकारने कारवाई करण्याचा निर्णय घेतला, तेव्हासरदार वल्लभ भाई पटेल यांनी तत्कालीन कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. डॉ.आंबेडकरांचे असे मत होते की, आपण जर सैन्य पाठविण्याचा निर्णय घेत असाल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे विपरीत परिणाम होतील. या घटनेची युनोमध्ये चर्चा होईल. भारताचे सैन्य हैद्राबाद संस्थानात घुसले व त्यांनी हैद्राबाद संस्थानावर आक्रमण केले असे अनेक अर्थ निघू शकतील. त्यावर डॉ. आंबेडकरांनी सुचना केली की आपण सैन्य पाठवू पण या कारवाईला ‘पोलीस अँक्शन’ असे नाव देवू. या डॉ.बाबासाहेबांच्या या सुचनेचा सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वीकार केला. त्या अगोदर आंतरराष्ट्रीय न्यायालयात व युनोमध्ये हैद्राबाद संस्थानाची बाजू मांडावी म्हणून निजामाने डॉ. आंबेडकरांना विनंती केली होती. मात्र निजामाची विनंती धुडकावून लावत निजामाला युनोमध्ये प्रतिवाद करण्यासाठी यत्किंचितही जागा रहाणार नाही, अशा रितीने आंतरराष्ट्रीय कायद्याचा मागोवा घेत कायदेशीर बाजू सांभाळण्याचे काम डॉ.आंबेडकरांनी केले.
भारताने सप्टेंबर महिन्यात ‘पोलीस अँक्शन’ची कारवाई केली.ही पोलीस कारवाई जनरल राजेंद्रसिंघजी (साऊथ कमांड) यांच्या नेतृत्वाखाली होती.त्यांनी अतिशय कुशलतेने सैन्य पाठविले या सैन्यापुढे निजाम सैनिकांचि टिकाव लागला नाही.शेवटी निजाम शरण आला.१७ सप्टेंबर १९४८ ला हैद्राबाद संस्थान निजामाच्या जुलूमातून मुक्त झाले. आणि मराठवाडा स्वतंत्र झाला.
यात अनेक स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ,सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे योगदान राहिले.
म्हणून आज या थोर क्रांतीकारक, हुतात्मे, स्वातंत्र्यसेनानी यांचे विचार आणि त्यांच्या कार्याला वंदन…