माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी,”जुनी पेन्शन योजना बंद केली,आम्ही सुरु करु.:- शिर्डीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले..

         राजेंद्र रामटेके 

तालुका ग्रामीण प्रतिनिधी कुरखेडा…

       महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे शिर्डी येथे आयोजित पेन्शन राज्य महाअधिवेशनास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी उपस्थित राहून संबोधित केले.

       नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना म. ना. से. नियम १९८२ व १९८४ अंतर्गत जुनी पेन्शन पूर्ववत व्हावी या प्रमुख मागणीसाठी मागील १० वर्षे ही संघटना लढा देत आहे.

       भाजपा सरकार नेहमीच कर्मचारीविरोधी राहिली आहे.काँग्रेस सरकारने जुनी पेन्शन योजना बंद केली,असा अपप्रचार करणाऱ्यांना आठवण करून देतो की,अटल बिहारी वाजपेयी सरकारने जुनी पेन्शन योजना बंद केली होती. 

       देशात काँग्रेसचे शासन असणाऱ्या कर्नाटक,तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यात जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे पहिल्या कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना सुरु केली.

         याचप्रमाणे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये ही योजना सुरु करू,अशी ग्वाही उपस्थितांना दिली.

        यावेळी समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे,खा.श्री.संजय राऊत,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आ.श्री.अंबादास दानवे,खा.श्री.भाऊसाहेब वाकचौरे,आ.श्री.अभिजित वंजारी,आ.श्री.सुभाष देसाई,आ. श्री.मिलिंद नार्वेकर,आ.श्री.सुधाकर अडबले,श्री.सुमित शेळके आणि जुनी पेन्शन संघटनेचे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी आणि लाखो सभासद कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.