केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आले असते,तर काँग्रेसने आरक्षण संपविले असते :- चरणदास इंगोले…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक

खल्लार :- नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सरकार स्थापन करण्या इतपत इंडिया आघाडीला यश प्राप्त होऊन केंद्रात महायुती ऐवजी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असते तर काँग्रेस पक्षाने आतापर्यंत एससी/एसटी चे आरक्षण संपवून मोकळे झाले असते असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी चांदूरबाजार येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत बोलताना केला आहे.

          विधानसभा निवडणुकीच्या व सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अमरावती जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या झंजावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक 14 सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी 2 वाजता विश्रामगृह चांदूरबाजार येथे पक्षाचे जिल्हा प्रभारी इंजि.चंद्रकांत गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली तथा जिल्हाध्यक्ष विलास पंचभाई यांच्या प्रमुख उपस्थितीत अचलपूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची संवाद बैठक पार पडली.

         यावेळी ते बोलत होते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चरणदास इंगोले पुढे म्हणाले की तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारने मागासवर्गीयांच्या सरकारी नोकरीतील कर्मचाऱ्यांचे पदोन्नती आरक्षण संपविले.

           त्याचप्रमाणे 2024 मध्ये केंद्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास मागासवर्गीयांचे संवैधानिक आरक्षण सुद्धा संपवण्याचा त्यांचा घाट होता. मात्र तो डाव फसला.

           काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी आरक्षण रद्द करण्याच्या संबंधाने अमेरिकेतील वाशिंग्टन येथे केलेल्या वक्तव्यावरून त्यांचा आरक्षण संपविण्याचा मनसुबा होता हे सिद्ध होते आहे.

           त्यामुळे काँग्रेसचे नीती प्रामाणिक दिसत असली तरी त्यांच्या नियतीमध्ये खोट असल्याची टीका करत राहुल गांधीच्या या वक्तव्याचा आपण पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून महाराष्ट्रात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीतील आरक्षण संपविणाऱ्या महाविकास आघाडीचे सरकार कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात येऊ नये. या दृष्टीने पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये काम करून एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी आतापासूनच प्रयत्नशील राहावे असे आव्हान चरणदास इंगोले यांनी कार्यकर्त्यांना केले.

           बैठकीला जिल्हा प्रभारी इंजि.चंद्रकांत गुल्हाने विलास जिल्हाध्यक्ष विलास पंचभाई जिल्हा कार्याध्यक्ष, विभागीय नेते डी.जे.खडसे, भास्कर वराडकर ,सुनील इंगोले, साहेबराव खडसे, नाना खंडारे के.डी .वानखडे, रोशन वानखडे, बाबुराव पाटील, गजानन ढवळे, संदीप गजबे ,नरेश ढोंगे ,किसन पाटील, विनोद पंचभाई, बाबाराव खडसे, तुकाराम इंगळे, अशोकराव इंगळे, रमेश माहुरे, राजू शिरसाठ ,राहुल सुतारे, राहुल गवई ,नाजुकराव नवले, सिद्धार्थ इंगळे, महिला आघाडीच्या प्रज्ञा पंचभाई सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.