युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- माहुली (धांडे) येथील शेतशिवारात विष प्राशन करुन एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारच्या सूमारास उघडकीस आली.
सुधाकर चंपतराव धांंडे (वय. 51) असे मुतकाचे नाव आहे. सूधाकर यांच्याकडे 1 एकर 20 गुंठे शेती आहे. ते लागवण पट्टांने शेती करत होते. घटनेच्यावेळी आसेगाव रोडवरील दुसऱ्याची लागवणने केलेल्या शेतात जाऊन विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली.
सुधाकर धांडे यांच्येवर बँकेचे कर्जं, शेती वाहण्याकरीता उसनवारीने घेतलेले पैसै तसेच सततच्या मुसळधार पावसाने झालेले शेत पिकांचे नुकसान या विवंचनेतून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
मृतक सुधाकर यांच्या पशचात पत्नी, 2 मुली असा आप्त परीवार आहे. या अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेत कुटुंब प्रमुखाच्या जाण्याने धांंडे कुटुंंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.