अबोदनागो चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
अमरावती ग्रामिण जिल्ह्यात असलेल्या अवैध धंद्यांना समुळ उच्चाटन करण्याकरीता ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री.विशाल आनंद,यांनी सर्व ठाणे प्रभारी यांना आदेशित केले होते.
याला अनुसरून दि.१२/०९/२०२४ रोजी पो.स्टे. धारणी येथे गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली. मिळालेल्या गुप्त बातमी वरुन कळमखार ते कुसुमकोट रोडवर आयशर क्र.एम.एच.१२ टी.डी. ७३०१ वाहन पंचासमक्ष थंबविले असता सदर वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व सुगंधीत तंबाखुचा वास आल्याने सदर वाहन हे पो.स्टे.ला आणुन शासकीय पंचासमक्ष तपासणी केली असता सदर वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा व सुगंधीत तंबाखु कि.अं.२६ लाख ०५ हजार,५००/- रुपये,आयशर कि.अं. १२ लाख रुपये असा एकुण ३८ लाख ०५ हजार ५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर गुन्ह्यात आरोपी १) जयेश निरंजन मिश्रा,वय ३० वर्ष,रा.विश्वास नगर ग्रामपंचायत,जि.इंदोर,२) रामलाल चरणदास मेहरा, वय २६ वर्ष,रा.विश्वास नगर ग्रामपंचायत,जि.इंदौर,३) सुनिल निशाद ऊर्फ चौधर रा. इंदौर,४) अमित गुप्ता रा.इंदौर,५) दिनानाथ ओझा रा.इंदौर अधिक ३ ते ४ ईसमा विरुध्द पो.स्टे. धारणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा प्रतिबंधीत गुटखा इंदोर येथुन अमरावती येथे काही इसमांकडे पोहचविण्यात येणार होता असे ताब्यातील आरोपीतांनी सांगितले आहे. पुढील तपास धारणी पोलीस करीत आहेत.
सदरची कार्यवाही श्री.विशाल आनंद,पोलीस अधिक्षक,अम.ग्रा.,श्री.पंकज कुमावत अपर पोलीस अधिक्षक, अमरावती.ग्रा.,श्री.शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी,धारणी यांचे मार्गदर्शनात श्री.अशोक जाधव,ठाणेदार,पो.स्टे.धारणी,श्री.सतिश झाल्टे,पोउपनि पो.स्टे. धारणी,पोलीस अंमलदार नितीन बौरसिया,शेख गणी,राम सोळंके,मोहीत आकाशे,जगत तेलगोटे,पंकज वानखडे यांनी केली आहे.