शहर प्रतिनिधी नागपूर
नागपूर : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक आंबेडकरी राजकीय पक्षांनी आपसात आघाडी करून निवडणूक लढवावी,माझा पक्ष बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष तयार आहे,सामाजिक संघटनांनी त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड. डॉ.सुरेश माने यांनी केले.
डॉ. सुरेश माने ,”पे बैंक टु सोसायटी,या सामाजिक संघटनाव्दारा 8 सप्टेंबर रोजी बानाईच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात आयोजित फुले,आंबेडकरी सामाजिक,राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या विशेष बैठकीत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडीने भाजपा पुन्हा सत्तेवर आपल्यास संविधान बदलेल असे भावनिक भीती दाखवून फुले,आंबेडकरी मतदारांना इंडिया आघाडीला मतदान करण्यास बाध्य केले.
पण कोणत्याही फुले-आंबेडकरी राजकीय पक्षांना सोबत घेतले नाही.इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या खासदारांची संख्या वाढली. काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळाले पण बहुजनवादी राजकीय पक्षांचे प्रचंड नुकसान झाले परिणामी बहुजनांची चळवळ कमजोर झाली.
म्हणून आता आगामी विधानसभा निवडणुकीत तरी फुले-आंबेडकरी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन आघाडी निर्माण करून निवडणूक लढवावी.
जर असे झाले नाही तर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीला स्वबळावर निवडणूक लढविल्याशिवाय पर्याय राहणार नाही.
या विशेष बैठक चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते वासुदेव डोंगरे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संयोजक गुलचंद रंगारी म्हणाले की वर्तमान परिस्थितीत फुले-आंबेडकरी बहुजन समाजाची धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,राजकीय अधोगती झाली आहे.
म्हणून आम्ही सामाजिक संघटनांनी समविचारी राजकीय पक्ष,सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींना एकत्र बसून चिंतन करून राजकीय पक्षांनी एकत्र बसून राजकीय भूमिका घ्यावी यासाठी ही बैठक चर्चासत्र आयोजित केले आहे.
पण बीआरएसपीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष स्वत:डॉ.सुरेश माने,संयुक्त जनमोर्चाचे प्रा.रमेश पिशे,प्रसिद्ध विधीज्ञ अँड.शैलेश नारनवरे हे प्रामुख्याने उपस्थित झाले.
पण इतर आंबेडकरी राजकीय पक्षाचे प्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवली याबद्दल खंत वाटते.याप्रसंगी बोलातना अँड.शैलेश नारनवरे,प्रसिध्द गायक अनिरूध्द शेवाळे,डॉ. रमेश पिशे यांनी ही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
पहिल्या सत्रात एम.एस.जांभूळे,डॉ.एम.एस. वानखेडे,रंजना लोखंडे,प्रतिभा खोब्रागडे यांनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन सुनंदा गायकवाड यांनी केले.