आगामी काळात बांबूच्या माध्यमातून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यावर भर ग्रामसभा प्रतिनिधीच्या बैठकीत माजी आमदार नामदेवराव उसेंडी यांचे प्रतिपादन…

भाविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

           येणारा काळात मुबलक प्रमाणात बांबू उपलब्ध होणार असून बांबू च्या माध्यमातून जिल्ह्यासाठी शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यास चांगली मदत होणार आहे असे प्रतिपादन गडचिरोलीचे माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी यांनी धानोरा येथे पाच परिसरातील ग्रामसभा प्रतिनिधीच्या बैठकीत गोटूल भूमी येथे प्रतिपादन केले.

             ही बैठक 10 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता गोटूल भूमी येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर शासनाच्या माध्यमातून सामूहिक वनाहक मिळालेल्या जमिनीवर व वैयक्तिक जमिनीवर बांबू लागवड करून करण्या संदर्भात चर्चा झाली.

             या बैठकीत बांबू लागवडीसाठी शासनाकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत एक हेक्टरला सात लाख रुपये अनुदान आहे. या योजनेमार्फत बांबू लागवड करण्यासाठी खर्च रोप लावणे रोपासाठी खड्डे खोदणे कुंपण करणे व व्यवस्थापन करणे व इतर कामे रोजगार हमी योजनेतून करावयाचे असून बांबू लागवड केल्यावर चार वर्षांनी बांबूचे उत्पादन मिळते.

            या माध्यमातून बांबूचे उत्पादन एकरी दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न शेतकऱ्यांना योजना धारकांना ग्रामसभा लाभधारकांना मिळणार तसेच पुढील 40 वर्ष उत्पन्न मिळत राहील त्यामुळे आधुनिक काळात पर्यावरण संतुलन साधण्यासाठी बांबू वर आधारित पर्यावरण पूरक उद्योग उद्योगांना चालना मिळणार आहे.

              तसेच बांबू टाइल्स फर्निचर अगरबत्ती काड्या टूथपिक व इतर वस्तूसाठी बांबूचा उपयोग होईल. कोळंश्या ऐवजी बांबूचा वापर करून वीज निर्मिती करण्याचे सरकारचे धोरण आहे असे प्रतिपादन केले.

             या बैठकीला ज्येष्ठ समाजसेवक डॉ. देवाजी तोफा तालुका ग्रामसभेचे अध्यक्ष बाजीराव नरोटे नहार पुजारी गणोजी जांगी मुक्तिपथ संघटक भास्कर कडयामी इलाका भुमिया गणेश मडावी बाजीराव गावडे श्रीराम दुर्वे परसराम कोवाची ग्रामसभा सचिव देविदास उसेंडी परसुराम नैताम गणेश मडावी आदी ग्रामसभा अध्यक्ष व सचिव तसेच आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते.