“राष्ट्रीय वन शहीद दिन” — दिनांक 11 सप्टेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय वनशहीद दिवस म्हणून पाळला जातो…

    अबोदनगो सुभाष चव्हाण

 जिल्हा प्रतिनिधी अमरावती/काटकुंभ

                  दखल न्युज भारत 

अमरावती :- नावाप्रमाणेच हा दिवस संपूर्ण भारतातील वन आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.त्या सर्व जिगरबाज वनधिकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण करण्यासाठी संपूर्ण भारतात पाळला जातो.

        मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती अंतर्गत चिखलदरा येथे स्थापित वनशहीद स्मारकावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक यांचे उपस्थितीत श्रीमती दिव्यभारती एम.उपवनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग,परतवाडा,श्री.अग्रिम सैनी,उपवनसंरक्षक,परतवाडा (प्रा.), श्री एम.एन.खैरनार,विभागीय वनअधिकारी (संशोधन व वन्यजीव), मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालय, अमरावती,श्री रामानुज बांगड,सहाय्यक वनसंरक्षक,गुगामल वन्यजीव विभाग,चिखलदरा,श्री.मोगरे, सहाय्यक वनसंरक्षक,गुगामल वन्यजीव विभाग,चिखलदरा,श्री.राहुल धाईत,वनपरिक्षेत्र अधिकारी, चिखलदरा परिक्षेत्र व श्री इवनाते, वनपरिक्षेत्र अधिकारी,गाविलगड परिक्षेत्र,चिखलदरा व इतर क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी वन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

       श्री एम.आदर्श रेड्डी,वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक,मेळघाट व्याघ्र प्रकल्प,अमरावती यांनी वन कर्मचारी यांना वनसंरक्षणाबाबत गस्ती करतांना आवश्यक त्या संरक्षनात्मक साहित्यासह शक्यतो सामुहिक गस्तीवर भर देण्याच्या सूचना दिल्या त्याचप्रकारे वन संरक्षणाच्या दृष्टीने उपलब्ध संरक्षण कॅम्प मध्ये आवश्यक त्या सुविधा पुरविण्याबाबत विभाग प्रमुखांना सूचना दिल्या व वन शहीद दिनि कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी वन शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.