सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेट सोसायटी लिमिटेड चंद्रपूरच्या सौजन्याने सावली शाखेतर्फे मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी सावलीचे नगराध्यक्ष लता लाकडे, नगरसेवक सतीश बोम्मावार, चंद्रपूर अर्बनचे अध्यक्ष रोहित बोम्मावार, जय किसान पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश गड्डमवार, पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे, डॉ. भास्कर सुकारे आदी मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात केली. यानंतर संस्थेच्या कार्यालयात वार्षिक सभा सोबतच बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष चरणदास बोम्मावार तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश गड्डमवार, देवराव मुद्दमवार, नगरसेवक सतीश बोम्मावार, रोहीत बोम्मावार, संचालक अनुराग सुरमवार, प्रफुल चेनुरवार, विलास मुस्कावार, गोविंद तेलंग, गणेश बनलावार, अॅड धनंजय आंबटकर, डॉ. भास्कर सुकारे आदी उपस्थित होते.
१० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था त्यात टायगर वन्यजीव रक्षक संस्था सावली, महावीर इंटरनेशनल सावली, आपदा ग्रुप, समृद्ध निसर्ग फाऊंडेशन सावली यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच संस्थांचे नवनियुक्त संचालक, अभिकर्ता, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी सावली येथील प्रसिद्ध स्वच्छतादुत परेश तावाडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत तसेच ते निस्वार्थ स्वच्छतादुत म्हणून कार्यरत असून दी महाराष्ट्र अर्बन बँक सावली वतीने युवा उद्योजक रोहित बोम्मावार यांच्या त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.