सरकार तुपाशी तर ITI धारक सुशिक्षीत बेरोजगार उपाशी… — सिव्हिल पदविका,पदवी च्या शिरकावाने झालेल्या PWD ZP WRD भरतीमध्ये तमाम ITI धारक बेरोजगार उमेदवारांवर अन्याय… — अन्यायग्रस्त ITI विद्यार्थ्यांची 2014 पूर्वीचीच शैक्षणिक पात्रता ग्राह्य ठेवणेबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन..

ऋषी सहारे 

   संपादक

मुंबई – सन 2014 पासून महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याच विभागाची पदभरती झालेली नाही.तब्बल 10 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शासनाच्या विविध विभागाच्या सरळसेवा रिक्त पदांच्या जाहिराती निघाल्या.यामधे PWD,WRD,ZP, तलाठी अशा विविध विभगाच्या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी शासनाच्यावतीने जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या.यामधील सार्वजनिक बांधकाम विभाग,जलसंपदा विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ग्रुप c या पदाच्या रिक्त जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या.या पदासाठी एसएससी उत्तीर्ण सोबत ITI मधील 1 वर्षाचा स्थापत्य अभियांत्रिकी कोर्स,बांधकाम पर्यवेक्षक( construction supervisor) , सिव्हिल draftsman, आरेखक व उच्च शैक्षणिक अहर्ता सिव्हिल पदविका,पदवी असी शैक्षणिक अर्हता  ठेवण्यात आली.

         परंतु 2014 च्या आधी झालेल्या पदभरती मध्ये वरील नमूद सबंधित विभागामध्ये फक्त एसएससी उत्तीर्ण सोबत ITI मधील 1 वर्षाचा स्थापत्य अभियांत्रिकी कोर्स,बांधकाम पर्यवेक्षक( construction supervisor) , सिव्हिल draftsman व आरेखक हिच पात्रता ठरविण्यात आली होती व हिच(2014 पूर्वीची) शैक्षणिक पात्रता आताच्या पभरतीमध्ये कायम ठेवण्यात यावी व सिव्हिल पदविका ,पदवी वाल्यांना वगळण्यात यावे यासाठी अनेकदा शासन स्तरावर ITI धारक विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली मात्र याकडे शासनाने कानाडोळा केला व सबंधित विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या परीक्षा घेऊन निवड यादी प्रसिध्द करण्यात आली.

         परिणामी  ज्या ज्या विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची  निवड यादी लावण्यात आली त्यामध्ये 98% मुल सिव्हिल पदविका व पदवी पात्रता असणारी उमेदवार सिलेक्ट झालेत.यामधे एकही ITI धारक उमेदवार निवड यादीमध्ये आलेला नाही.

         शासनाच्या चुकीच्या निर्णयाने आज  ITI झालेल्या सुशिक्षीत बेरोजगारवर उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे.स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हा एकमेव हक्काचा पद ITI धारकांसाठी निर्माण करण्यात आलेला होता.

         दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील बऱ्याच मुलांनी सबंधित पदाकरीता लागणारी  कोर्स ITI व खाजगी प्रशिक्षण संस्थांमधून फीस भरून प्रमाणपत्र मिळवलेली आहेत..मात्र शासनाच्या चुकीच्या शासन निर्णयाने आज ITI धारक बेरोजगार विद्यार्थ्यांवर झालेल्या पदभरती मध्ये अन्याय झालेला आहे..

        स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हा पद शासनाकडून त्यावेळी फक्त ITI  धारक उमेदवारांना करिता निर्माण करण्यात आलेला होता..2014 पर्यंत बरेच ITI झालेली मुल वरील नमूद विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर रुजू झालेले आहेत..2 वर्षाच्या आधी झालेल्या शासनाच्या MIDC, म्हाडा या विभागामध्ये तर फक्त ITI झालेल्या उमेदवारांचीच पात्रता गृहीत धरण्यात आली.

        तसेच आरोग्य विभागातील आरोग्य सेविका या पदाकरीता फक्त ANM हि दोन वर्षाची पदविका पात्रता मध्ये असते यामधे GNM व BSC nursing हि उच्च शैक्षणिक अहार्ता पात्र केलेली नाही.

        तसेच शिक्षण विभागामध्ये सुध्धा 1 ते 5 या वर्गाकरिता फक्त D.Ed धारक पात्र केलेले आहेत यामध्ये B.ED हि उच्च शैक्षणिक अहर्ता धारकांना अपात्र केलेले आहे..परत वीज वितरण ( MSEB ) विभागामध्ये विद्युत सहाय्यक या पदाकरीता फक्त ITI electric हिच अहर्त गृहीत धरण्यात आलेली आहे यामधे diploma , degree ला पात्र केलेले नाही.

        आता नुकताच प्रसिद्ध झालेल्या नगरचना विभागामधील सहाय्यक नगर रचनाकार या पदाकरीता डिप्लोमा धारकांचाच विचार करण्यात आलेला आहे.शासनाने वरील विभागातील ग्रुप c च्या  या पदाकरीता  पदविका पदवी वाल्यांना पात्र केलेले नाही.मग PWD ZP व WRD मधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या ग्रुप C च्या पदाकरीता पदविका पदवी वाल्यांना का पात्र केले आहे.

         अशी ओरड ITI धारक उमेदवारांमध्ये निर्माण झालेली आहे.वरील सर्व नमूद विभाग हे शासनाच्या अधिपत्याखाली येतात मग ग्रुप C च्या पदाकरीता एका विभागात उच्च शैक्षणिक अहर्त धारकांना पात्र करायच व दुसरीकडे अपात्र करायचं अशी शासनाची शैक्षणिक पात्रतेविषयी असमानता का अशी  ITI धारकांकडून शासनाला विचारणा होत आहे.ITI झालेल्या उमेदवारांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर नोकरी लागण्याची एकमेव संधी होती.

      परंतु डिसेंबर 2015 च्या शासन परिपत्रका ने सर्व जागा डिप्लोमा व डिग्री धारकांच्या घशात घातल्या.याउलट डिप्लोमा डिग्री धारकांना शासनाच्या विविध विभागात अनेक संध्या असताना ग्रुप C च्या जगेकरिता पात्र करून ITI धारकांच्या हक्काचा जागा गिळंकृत केलाय.आता आम्ही ITI धारकांनी काय करावे अशी विचारणा करून शासन प्रती रोष व्यक्त करण्यात येत आहे.

           या अन्यायाची जाणीव करून देणेसाठी (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाकरीता पूर्वीचीच पात्रता पूर्ववत करणेबाबत) तमाम ITI धारक बेरोजगारांनी 05/09/2024 ला प्रत्यक्ष मुख्यमंत्री च्या केबिनमध्ये जाऊन मुख्यमंत्री महोदयांना निवेदनाद्वारे मागणी केलेली असल्याचे समझते.