सरपंचताईने फुलवले चिमुकल्या बालकांच्या चेहऱ्यावर हास्य….    — चिमुकल्या बालकांची त्वरित केली सरपंचानी मागणी पूर्ण….     — चिमुकल्या बालकांना मोफत गणवेश वाटप करतांना सरपंच तुळसा श्रीरामे…… — पेठभान्सुली खंडाळ्याच्या सरपंच तुळसा श्रीरामे यांचा अनोखा उपक्रम……                  

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि          

       चिमुर तालुक्यातील शेवटच्या टोकावर पेठभान्सुली गाव असुन येथे गट ग्रामपंचायत आहे. पेठभान्सुली गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ.तुळसा देविदास श्रीरामे यांनी मौजा पेठभान्सुली व खंडाळा येथील दोन्ही अंगणवाडी येथील दोन्ही अंगणवाडी केंद्राला भेट देऊन अंगणवाडी केंद्राची पाहणी केली व बालकांना निर्माण होत असलेल्या समस्या जाणून घेतल्या व बालकांनी गणवेश वाटप करण्याची मागणी केली.

        सरपंचानी त्वरित ती मागणी पुर्ण केल्याने चिमुकल्या बालकांन मधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे चिमुकल्या बालकांना गणवेश वाटप करण्यात आले यावेळी चिमुकल्या बालकांशी सरपंचांनी संवाद साधला चिमुकल्या बालकांचा अंगी असलेल्या सुप्त गुणांबाबत चर्चा केली व बालकांना योग्य आहार पोहोचते की नाही याबाबत आढावा घेण्यात आला….

          पेठभान्सुली व खंडाळा या दोन्ही गावाचा अंगणवाडीची स्थापना सन 1982 मधे झाली असून आता पेठभान्सुली येथील अंगणवाडीमधे 0 ते 6 वयोगटातील एकूण संख्या 12 आहे व खंडाळा येथील अंगणवाडीमधे 0 ते 6 वयोगटातील एकूण 09 मुले आहेत एकंदरीत दोन्ही गावातील अंगणवाडीमधील चिमुकल्या बालकांची एकुण संख्या 21 मुला-मुलींना गट ग्रामपंचायत पेठभान्सुली सरपंच तुळसाताई श्रीरामे यांनी मोफत गणवेश वाटप करून चिमुकल्या बालकांचा चेहऱ्यावर हास्य फुलवले….

      यावेळेस पेठभान्सुली गट ग्रामपंचायत प्रथम नागरिक सरपंच सौ.तुळसा श्रीरामे, ग्रामपंचायत सदस्या बेबीताई रासेकर,गावचे पोलीस पाटील गुलाब धोंगडे, अंगणवाडी सेविका शिलाताई बघेल,गुर्वे ताई, मदतनीस चौखे, मंगला वाकडे,नामदेव कुमरे, युवा सामाजिक कार्यकर्ते आकाश श्रीरामे उपस्थित होते….