बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा शाल श्रीफळ व फुलांचा गुच्छ देऊन सन्मान करुन गुरुंचा आशीर्वाद घेतला.
5 सप्टेंबर हा दिवस डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस, शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात आला. शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इयत्ता दहावीच्या विद्यार्थांनी आजच्या दिवसाचे अध्यापनासह सर्व कामकाज केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत कोरटकर सर यांची निवड करण्यात आली. विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक पोळ सर यांचे हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मुख्यध्यापक भरत कोरटकर सर यांचे हस्ते संस्थापक अध्यक्ष कै. लोकनेते महादेवराव बोडके दादा यांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रम सुरुवात करण्यात आली.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सर्व शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विनी चव्हाण या विद्यार्थीनींने केले. तर सर्वांच्या वतीने लवटे सर यांनी सर्व विद्यार्थी याचे आभार मानले.