अबोदनागो चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
आदिवासी बाहुल्य मेळघाटातील बहुतांश भागात अद्यापही वीज पोहोचली नसल्याने तेथील आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात अळचणींचा सामना करावा लागत आहे.
चिखलदरा तालुक्यातील जरिदा येथील ३३ के.व्ही.विज वाहिनी व उपकेंद्रास वनविभागाची परवानगी देण्याची मागणी खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी आज श्री. रेड्डी,प्रधान सचिव,वन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडे केली.
चिखलदरा तालुक्यातील जरिदा येथील ३३ के. व्ही. विज वाहिनी व उपकेंद्राचे काम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मार्फत प्रगतीपथावर आहे.
सदर उपकेंद्र सुरू झाल्यास मेळघाटातील अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना वीज सहज उपलब्ध होणार असून वर्षोंनवर्षे त्यांच्या आयुष्यात असणारा अंधार मिटणार आहे.
जरीदा येथील ३३ के. व्ही. विजवाहिनी व उपकेंद्र सिपणा वन्यजीव विभाग आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत असल्याने याला वन विभागाच्या परावनगीची आवश्यकता आहे.
सदर उपकेंद्र सुरू झाल्यास मेळघाटातील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होऊन त्याच्या फायदा आदिवासी बांधवांना होऊन आरोग्यविषयक फायदा देखील त्यांना होणार आहे.
तसेच मेळघाटातील आदिवासी बांधवांचे आरोग्य,शिक्षण आणि अन्य आवश्यक बांबीसोबत जीवनमान उंचावणार आहे.
सदर उपकेंद्र सुरू करणेबाबत वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत वन विभागाची परवानगी आवश्यक असून याबाबत खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हा स्तरावरून पाठपुरावा सुरू केला व परवानगीचा प्रस्ताव प्रधान सचिव,वन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडे सादर केला.
गुरुवार दिनांक ०५/०९/२०२४ रोजी खासदार बळवंतभाऊ वानखडे यांना प्रत्यक्ष भेटून श्री.रेड्डी प्रधान सचिव वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे चिखलदरा तालुक्यातील मौजा जरिदा येथील ३३ के. व्ही. विजवाहिनी व उपकेंद्राचे कामास वन विभागाची परवानगी देण्याची मागणी केली.
यास प्रधान सचिव,वन विभाग,मंत्रालय मुंबई यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच परवानगीचे प्रकरण निकाली काढण्याचे आश्र्वासित केले.