नंदलाल पाटील कापगते विद्यालयात शिक्षक दिन साजरा…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली – नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे दिनांक 5 सप्टेंबरला भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जयंती चे औचित्य साधून विद्यालयात शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

       कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती आर.बी.कापगते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.स्वाती गहाणे, प्रा.के.जी.लोथे, डी.एस.बोरकर, एम. एम.कापगते व इतर मान्यवर उपस्थित होते.

           कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले.

        शिक्षक दिन या कार्यक्रमाची रूपरेषा विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आखली. संपूर्ण विद्यालयात स्वयंशासन चा कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थीच हे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, परिचर ही भूमिका योग्यरित्या पार पाडून शाळेचा संपूर्ण व्यवस्थापन उत्तमरीत्या हाताळले. मुख्याध्यापिका आर.बी.कापगते यांनी आपले अध्यक्षीय मनोगतातून शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते, शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे.

           भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्येच आहे असे मौलिक विचार श्रीमती आर. बि. कापगते यांनी व्यक्त केले. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गीत, भाषणे व इतर कार्यक्रम सादर केलेत. स्वयंशासन स्पर्धेमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. स्वयंशासन मध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला उस्फूर्तपणे पारितोषिक मान्यवरांचे हस्ते वितरित करण्यात आले.

         कार्यक्रमाचे संचालन आर. व्ही. दिघोरे यांनी तर आभार प्रदर्शन एस. व्ही. कामथे यांनी केले.