युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूरमधिल जुन्या शहरातील मोमीनपुरा येथे मंगळवार दि ३ संप्टे रोजी रात्री ९:३० वाजता एका ३४ वर्षीय युवकावर कारण नसतांना एकाने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी घटनेतील गंभीर जखमीच्या तक्रारीवरून मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इमरान खान वल्द हुसेन खान वय.३४ असे गंभीर जखमीचे नाव असून जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे उपचार सुरु आहे. घटनेतील फिर्यादी इमरान खान वल्द हुसेन खान हे दर्यापूरातील मोमीनपुरा येथील त्यांच्या घरासमोर उभे असताना घटनेतील आरोपी शेख नईम वल्द शेख कय्युम व त्याचा भाऊ शेख नाजीम यांचे भांडण सुरू होते.
फिर्यादी हे भांडण पहायला गेले असता आरोपी याने काहीही कारण नसताना फिर्यादी इमरान खान याला मानेवर, पाठीवर, डाव्या बाजूस व डाव्या बरगळीवर चाकूने वार करून इमरान खान याला गंभीर जखमी करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
गंभीर अवस्थेत जखमी इमरान खान वल्द हुसेन खान यांनी प्रथम उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे उपचारासाठी भरती केले मात्र गंभीर मार असल्याने त्याला पुढील उपचारासाठी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय,अमरावती येथे हलविण्यात आले.
घटनास्थळी एपीआय सुलभा राऊत यांनी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान बुधवारी सकाळी आरोपी शेख नईम शेख यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.