पक्षाचे राजकीय धोरण राबविण्यावर भर द्यावा,कार्यकर्त्यांच्या संवाद परिषदेत प्रा.जोगेंद्र कवाडे यांचे प्रतिपादन…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

       पीपल्स रिपब्लिकन पार्टीची आघाडी खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने सोबत असली तरी पर्यायाने आपला पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे.

           त्यामुळे पक्षाचे जे राजकीय धोरण ठरलेले आहे ते धोरण राबविण्यावर पक्षातील कार्यकर्त्यांनी अधिकाधिक भर द्यावा असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा जोगेंद्र कवाडे यांनी अमरावती येथे विभागीय कार्यकर्ता संवाद परिषदेत बोलताना केले आहे.

           मिशन विधानसभा 2024 च्या पार्श्वभूमीवर 1 सप्टेंबर 20 24 (रविवार) रोजी दुपारी 1वाजता अमरावती येथे शासकीय विश्राम भवन सभागृहा मध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अमरावती विभागीय कार्यकर्त्यांची संवाद परिषद आयोजित करण्यात आली होती.

             माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या अमरावती विभागातील पाचही जिल्ह्याच्या संवाद परिषदेचे उद्घाटन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

            पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या संवाद परिषदेला मंचावर प्रदेश महासचिव नांदेड मनपा माजी नगरसेवक बापूराव गजभारे ,उल्हासनगर मनपा तथा पक्षाचे प्रदेश संघटन सचिव प्रमोदराव टाले, स्वागताध्यक्ष व पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष प्रा.डी.के.वासनिक, यांचे सह अमरावती जिल्हाध्यक्ष विलास पंचभाई, जिल्हा प्रभारी चंद्रकांत गुल्हाने, यवतमाळ जिल्हाध्यक्ष देवमन खडसे ,वाशिम जिल्हा अध्यक्ष दौलत हिवराळे ,बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय गवई, अकोला जिल्हाध्यक्ष नागसेन क्षीरसागर ,अनिल गवई , नागपूर शहराध्यक्ष कैलास बोंबले, विदर्भ उपाध्यक्ष गौतम कासारे ,प्रदेश कार्यकारणी सदस्य कैलास नरवाडे ,महिला आघाडी च्या विदर्भाध्यक्ष सुवर्णाताई वानखडे ,अमरावती शहराध्यक्ष एडवोकेट दीपक आकोडे शहर कार्याध्यक्ष वासुदेव सामटकर इत्यादी नेते मंचावर उपस्थित होते.

           संवाद परिषदेला भरगच्च उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रा.जोगेंद्र कवाडे सर पुढे म्हणाले की, महायुतीच्या माध्यमातून जनसामान्यांचे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी झाला तर फायदाच होईल नुकसान होणार नाही. पक्षात राहून पक्षाच्या धोरणा विरोधी बोलू नये आवडले नसेल तर त्यांनी कुठेही जावे. पक्षाचे जे धोरण ठरले त्याचे समर्थन झाले पाहिजे असे सांगून आपण एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेल्याने पर्यायाने आपल्या महायुतीतील प्रवेशामुळे संविधान बदलू पाहणाऱ्यांचे तोंड बंद झाले एवढेच नव्हे तर ते आज संविधानाच्या बाजूने बोलू लागले हा मोठा फरक आपल्या युतीमुळे झाला असून हा बदल आपल्या युतीची फलश्रुती आहे.

          कार्यकर्त्यांनी झालेला हा सकारात्मक फरक समजून घेतला पाहिजे आणि तो जन माणसापर्यंत व समाज बांधवांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला पाहिजे.पक्षाने घेतलेला निर्णय मान्य करावा नाहीतर घरी बसावे.

            यापुढे पक्षविरोधी धोरण राबवून इतर पक्षांना पाठिंबा द्यायचा असेल तर अगोदर पक्षाचा राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडावे असेही प्रा.जोगेंद्र कवाडे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले असता कार्यकर्त्यांनी सर कवाडे आगे बढो! हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा देऊन कवाडे सरांच्या भूमिकेचे जोरदार स्वागत केले.

          यावेळी ओबीसी नेते चंद्रकांत गुल्हाने यांनी पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांना प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते अमरावती जिल्हा प्रभारी पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

           मंचावर उपस्थित पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवा नेते जयदीपभाई कवाडे / संवाद परिषदेचे अध्यक्ष व पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले/ प्रदेश महासचिव बापूराव गजभारे /प्रदेश संघटन सचिव प्रमोदराव टाले/ स्वागताध्यक्ष प्रा.डी .के.वासनिक,/ नवनियुक्त अमरावती जिल्हा प्रभारी चंद्रकांत गुल्हाने/ जिल्हाध्यक्ष विलास पंचभाई/ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष देवमन खडसे/ वाशिम जिल्हा अध्यक्ष दौलत हिवराळे/ बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय गवई /अकोला जिल्हा उपाध्यक्ष अनिल गवईनागपूर येथून कार्यक्रमाला उपस्थित नागपूर शहराध्यक्ष कैलास बोंबले /महिला आघाडीच्या सुवर्णाताई वानखडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले,तर आभार प्रदर्शन अमरावती शहराध्यक्ष एडवोकेट दीपक आकोडे यांनी केले. 

            संवाद परिषद यशस्वी करण्यासाठी वासुदेव सामटकर, बुद्धदास इंगोले ,जानराव वाटाणे, सुरेश बहादुरे ,गंगाधर खडसे ,साहेबराव वानखडे, भास्कर वराडकर, युवा जिल्हाध्यक्ष सुनील इंगोले ,डॉ अशोक गुजर ,प्रवीण सरोदे, चंद्रकांत रंगारी, चंद्रभान मोहोड, माणिक गाडगे, श्रीकृष्ण पळसपगार ,मन्नू भाऊ अग्रवाल, रामराव शेंडे, पंजाबराव सुरवाडे ,आनंदराव वानखडे ,इत्यादीं कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.