पोळ्याच्या दिवशी गाईने दिला जुळ्या वासरांना जन्म…

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक

            बैलपोळ्याच्या शुभ दिवशी दर्यापूर तालुक्यातील सांगळुद या गावचे प्रगतीशील शेतकरी आणि वारकरी पंथाचे मार्गदर्शक, नागरिक हक्क समितीचे सक्रिय सभासद गजानन पाटील साखरे यांच्याकडे कडील गाईने सातव्या वेतामध्ये जुळ्या वासरांना जन्म दिल्याने साखरे परिवारात आणि सांगळुद गावामध्ये सुद्धा ह्या निसर्गाच्या चमत्काराचे कौतुक होत आहे.

         पोळ्या सारख्या धार्मिक सणाच्या दिवशी शेतकरी कुटुंबात गाईला जुळे झाल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

         गजानन पाटील साखरे हे अत्यंत धार्मिक वृत्तीचे असल्याने त्यांच्या परिवाराने नुकत्याच जन्मलेल्या जुळ्या भावंडाचे पूजा करुन स्वागत केले.

         ह्या आनंदमय घटनेचे साक्षीदार होण्यासाठी नागरिक हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष ऍड संतोष कोल्हे सचीव शरद रोहणकर, सदस्य नागेश रायबोले,आणि त्यांचे मित्र मंडळीने गजानन पाटील साखरे यांच्या गावी घरी जाऊन त्यांचे ह्या निसर्गाच्या चमत्कारासाठी अभिनंदन केले व नवजात वासरांचे दर्शन घेतले.