ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली : खास लहान मुलांना मान देण्याची प्रथा म्हणून साजरा करण्यात येणारा ताना पोळा शहरातील वेगवेगळ्या भागात मोठ्या उत्साहात साजरा झाला.
शहरातील अजीत बाबा चौकात भरविण्यात आलेल्या तान्ह्यापोळ्यात चिमुकल्यांनी आपापल्या नंदीबैलांना घेऊन प्रचंड गर्दी केली होती. पोळ्यात सहभागी झालेल्या चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यांना घेऊन आलेले पालक तसेच बघे म्हणून आलेले नागरिक या चिमुकल्यांच्या बैलांच्या सजावटीची प्रशंसा करीत होते.
पंचशील वार्डात असलेल्या अजित बाबा समाधी प्रांगणात भरलेला तान्हा पोळाही अनेकांचे आकर्षण ठरला. वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा आणि केशभूषा करून आलेले बालगोपाल आणि त्यांचे चिमुकल्या नंदीपासून तो काष्ठशिल्पाचा अप्रतिम नमुना असलेले बैल नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी अजितबाबा समाधी परिसर पंचशील वॉर्ड साकोली येथील सर्व वरिष्ठ रहिवासी,महिला भगिनी,सर्व नारी शक्ती,युवक मंडळी व बालगोपाल यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.