नवजीवन सीबीएसई ची साक्षरता अभियान प्रभात फेरी…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली :- नवजीवन कान्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कूल सीबीएसई साकोली येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उक्रमाअंतर्गत नवभारत साक्षरता अभियान प्राचार्य मुजम्मिल सय्यद, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर , वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी विनोद कीरपान व सतिश गोटेफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

          आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य केले जाते यासाठी नवभारत साक्षरता अभियान प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.

         रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जनजागृती नारेबाजी करून केली आणि समाजातील लोकांनी अशिक्षित राहू नये शिक्षित व्हावे सगळ्या मुलांना शिक्षणाचे लाभ व्हावे म्हणून आमच्या शाळेच्या वतीने प्रयत्न पथनाट्य करून करण्यात आले.

         रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. प्राचार्य व शिक्षकांच्या मार्गदर्शनातून नवभारत साक्षरता अभियान याविषयी विद्यार्थ्यांना बहुमोलाचे मार्गदर्शन करण्यात आले व विद्यार्थ्यांच्या मार्फत गावकऱ्यांना शिक्षणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

           नवभारत साक्षरता रॅलीचे यशस्वितेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.