कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवणी
पारशिवनी :- शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला बैलपोळा हा सण पारशिवनी शहरातील तकिया मारोती देवस्थान परिसरात आज सोमवार २ सप्टेंबरला शंभर पेक्षा अधिक बैल जोडी च्या उपस्थितित मानाची पुजा पाटिल रवि तरार यांनी सर्व बैलाची पुजा केली व मोठ्या उत्साहात शांततेत साजरा करण्यात आला.
पारशिवनी शहर सह तालुक्यातील प्रत्येक गावी शेतकऱ्यांनी दुपारपासूनच बैलांना सजवण्याची तयारी केली होती. संध्याकाळ होता पोशिंदा बैलांना सुंदरपणे सजवून शेतकऱ्यांचा बैलाची प्रतिष्ठित पाटील तर्फे मनोभावे मानाची पूजा करीत बैला च्या पुजा करून शहरात व ग्रामिण भागात पोळा फुटला. या निमित्ताने तालुका भर आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र जागोजागी प्रत्येक गावी पहायला मिळाले.
या प्रसंगी शहरात तकिया मारोती मंदिरच्या परिसरात पोलिस निरिक्षक सह पोलिस कर्मी उपस्थितीत व प्रत्येक गावात पोलिस कर्मी पोलिस पाटिल सरपंच तसेच प्रतिष्ठित नागरिकाच्या उपस्थितीत बैलांचा पोळा उत्सव शांततेत साजरा करण्यात आले.