आपत्ती आणि आगीशी लढा देणाऱ्या श्याम मस्के व त्याची टिम चा भव्य सत्कार.

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

 पारशिवनी :- महाराष्ट्र शासनाच्या हरकती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागातर्फे वसंतराव नाईक स्मृती सभागृह, वनामती सभागृह, व्ही.पी.रोड, नागपूर येथे आपत्ती व्यवस्थापन परिषद 2024 ‘दक्ष’ आयोजित करण्यात आली होती.

             यामध्ये आपत्ती व्यवस्थापन जनजागृती उपक्रमांतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे ज्ञान आणि सुरक्षित जीवनाचे वरदान या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपत्ती आणि अतिवृष्टीमुळे राज्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आपत्ती आणि पूर यांचा सामना करताना आपत्ती आणि अग्निशमन विभागाची भूमिका महत्त्वाची ठरते.

         अग्निशमन विभागाने नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातही अनेक महत्त्वाची बचावकार्ये पार पाडली. पूर असो वा आग, सदैव सतर्क रहा. त्यानिमित्त कार्यक्रमादरम्यान अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमादरम्यान नागपूर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे माजी संचालक डॉ.जी.एस. सैनी, हवामान तज्ज्ञ डॉ.प्रवीणकुमार, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गोवर्धन नवखरे यांच्या उपस्थितीत पारशिवनी तालुक्यातील श्याम मस्के यांचा सत्कार करण्यात आला.

           याशिवाय अग्निशमन विभागाच्या समन्वयक अरुपा आनंद, उपअग्निशमन अधिकारी सतीश रहाटे, चंद्रशेखर रणदिवे, रवींद्र त्रिवेदी, प्रवीण झाडे, प्रकाश कावडकर, रूपेश मानके, रवींद्र मरसकोल्हे, सुरेश आत्राम, मुख्य अग्निशमन बचावकर्ते विलास त्रिलगुळे, शंकर कांबळे, वाहनचालक डी.एन. राजू पवार, प्रशांत भक्ते, योगेश खोडके आदींचा समावेश होता.

          यावेळी जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन सहाय्य व पुनर्वसन विभाग, D.D.M.O.N.D.R.F., S.D.R.F, महाराष्ट्र शासनाच्या अग्निशमन विभागाच्या उपस्थितीत पारशिवनी तालुक्यातील श्याम मस्के व त्यांच्या संस्थेला विशेष पुरस्कार प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.