रानटी हत्तीचा बंदोबस्त करा,निवेदनाद्वारे खासदार डॉ.नामदेव किरसान यांची मागणी…

           राजेंद्र रामटेके 

ग्रामीण तालुका प्रतिनिधी कुरखेडा..

       गडचिरोली जिल्हातंर्गत आरमोरी व कुरखेडा तालुक्यात रानटी हत्तीनीं घातलेल्या धुमाकूळा बाबत मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांना खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी अवगत करुन दिले.

        रानटी हतींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची कारवाई करावी याबाबत संबंधित वनसंरक्षक यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली व तसे पत्र खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी त्यांना दिले.

          यावेळी कांग्रेस कमिटी गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद मनोहर पाटील पोरेटी,सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विश्वजीत कोवासे,जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले,शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते,काँग्रेस कार्यकर्त्ता रामदास मसराम,नेताजी गावतुरे,गौरव येनप्रेड्डीवार,विपुल एलटीवार,कुणाल ताजने,नितीन राऊत व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.