लेखक राजेश दिवटे यांचे कार्य समाजाला अभिमानास्पद :- आ.चेतन तुपे… — स्वामी विवेकानंद राष्ट्रप्रेरणा पुरस्काराने राजेश दिवटे सन्मानित…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : लेखक राजेश दिवटे हे सर्व सामान्य कुटुंबात जन्माला येऊन हालाखीचे जीवन जगत असतांना मंडई हमाली करत शिक्षण घेत एक उत्तम व्याख्याते व लेखक म्हणून नावारुपाला आले आहे दिवटे यांचे कार्य समाजाला अभिमानास्पद व प्रेरणादायी असल्याचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी सांगितले आहे.

 

         यशवंती आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व प्रेरणादायी व्याख्याते राजेश दिवटे यांना पुणे येथील स्नेह स्मित फाऊंडेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद राष्ट्र प्रेरणा पुरस्काराने आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुदंडा, रवींद्र चव्हाण, गोविंद पवार, संतोष सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.

         राजेश दिवटे हे महाराष्ट्रातील एक युवा प्रेरणादायी व्याख्याते असुन आजपर्यंत अनेक शाळा, महाविद्यालयात त्यांनी मोफत व्याख्यान दिले आहे. तसेच ते एक पर्यावरण मित्र म्हणून परिचित आहेत. त्यांनी रक्तदान शिबीर, झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम, गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व दतक योजना यशवंती फाऊंडेशन च्या वतीने राबविण्यात येत आहे.