नवेगाव खैरी धरणाचे सोळा पैकी आठ गेट उघडले.  — या मधून ५७४. ७७२ क्यूमेक्स विसर्ग नदीपात्रात…              

      कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी  

पारशिवनी:- पेंच – नवेगाव खैरी धरणात पाणी साठा  १००% टक्के आहे.

     मध्यप्रदेश मध्ये सुरू असलेले पावसामुळे चौराई धरणातून विसर्ग सोडण्यात आला असल्याने तोतलाडोह धरणात येवा वाढला असून तोतलाडोह धरणाचे वक्रद्वार उघडण्यात आले आहे. 

       तसेच तोतलाडोह जलविद्युत निर्मितीतून बाहेर पडणारा पाण्याचा विसर्गामुळे आज शनिवार दि.३१/०८/२०२४ ला आता दुपारी ०१.३० वा. पेंच नवेगाव खैरी  धरणाचा पाणीसाठा १००% झाल्यामुळे धरण सुस्थीतीत/ नियंत्रणाकरीता  जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे  धरणाचे  सर्व १६ गेट पैकी  ०८ गेट ०.३० मी. आणि  सहा गेट ०.५० मि उंचीने उघडण्यात आले आहे.

       यामधून ५७५.७७२ क्यूमेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.यामुळे कन्हान नदी,पेंच नदी काठावरील गावांतील नागरिकांनी तसेच नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्व संबंधीतानी स्वतः ची काळजी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.याचबरोबर नदीपात्राजवळ जाणे टाळावे असेही सुचविण्यात आले आहे.

      सर्व यंत्रणांनी आवश्यक ती संपुर्ण खबरदारी बाळगून सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या स्तरावरुन तसे सर्व संबंधितांना त्वरित सुचीत करण्यात आले आहे.तद्वतच सतर्कतेचा ईशारा देण्यात आले आहे.

        तसेच जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे नागरिकांनी टाळावे.

     सर्व यंत्रणांनी आवश्यक ती संपुर्ण खबरदारी बाळगून सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या स्तरावरुन तसे सर्व संबंधितांना त्वरित सुचीत करण्यात आले आहे.

        पाणीसाठा टक्केवारी : १००.००% आहे.

अशी माहिती एन.एस.सावरकर उपविभागीय अभियंता व अभियंता रिजवान छवारे पेंच पाटबंधारे उपविभाग पारशिवणी आणि तहसिलदार राजेश भंडारकर यांनी दिली.