आर.आर.आर्चर प्लॅनेटचे धनुर्धारी चमकले…

निलय झोडे

 उपसंपादक

दखल न्यज भारत

 युवक सेवा संचानालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा दिनांक 30/08/2024 ला छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे पार पडल्या.

          सदर स्पर्धेत आर आर आर्चर प्लॅनेट चे धनुर्धारी 14 वर्षखालील कंपाऊंड राऊंड गटात पलक संदीप बावनकुळे ई 7 वी ( नवजीवन इंग्लिश स्कूल साकोली ) प्रथम , इंडियन राऊंड गटात चिन्मयी निलय झोडे ई .6वी( स्कायवॉर्ड इंटरनॅशनल स्कूल पिंपळगाव) प्रथम, चिराग विजय साखरे ई 6वी ( के के. हायस्कूल साकोली) तृतीय क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

          त्यांच्या यशाबद्दल अमेचूअर आर्चरी असो भंडारा चे अध्यक्ष नईम कुरेशी,उपाध्यक्ष रमेश दृगकर, सहसचिव व तालुका क्रीडा संघटक शहीद कुरेशी, पालकगण संदीप बावनकुळे, निलय झोडे, सय्यद सर, माटे मॅडम,क्रीडा शिक्षक खराबे सर, काठाने सर, भेंडारकर सर प्रशिक्षक रविकुमार रंगारी, रविना रंगारी, हर्ष रंगारी यांनी त्यांचे गौरव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.