अंजनगाव सुर्जी येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न… 

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

          दि.३० ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह अंजनगाव सुर्जी येथे वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नवीन तालुका अध्यक्ष यांच्या निवडीबाबत चर्चा करण्यात आली असून इच्छुक तालुका अध्यक्षांना फार्म भरून घेण्यात आला.

          येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित सत्तेपर्यंत कशी पोहोचेल यावर कार्यकर्त्यांच्या कडून सकारात्मकता दिसली. नवनियुक्त जिल्हाप्रमुख संजय चौरपगार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

          संपूर्ण जिल्हा कार्यकारणी व तालुक्याचे कार्यकर्ते बैठकीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           जिल्ह्याचे पदाधिकारी सदानंद नागे, साहेबराव वाकपांजर, अतुल नळकांडे, रुपेश वाट, अंकुश वाकपांजर,मंगेश शिंदे, रत्नदीप लबडे, सतीश मुरकुटे, विकास खंडारे, संघरतन सरदार, सुनील राक्षसकर, रोहित इंगळे, अरुण बर्डे, संघपाल बाविस्कर, रोशन लबडे, उपसरपंच श्रीधर धांदे, ऍड अनुराग वानखडे, अरुण खंडारे, पंकज वारुळे, रोशन इंगोले, महेंद्र वानखडे, अक्षय इंगळे, दादाराव खंडारे, ज्ञानेश्वर आठवले, सरपंच प्रशांत वानखडे, निलेश घुसे, रामेश्वर पाखरे, आर आरिफ, सुनील मदनकार, प्रेमानंद इंगळे, हजर होते.