मिलिंद विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

 युवराज डोंगरे 

खल्लार उपसंपादक

         नजिकच्या गौरखेडा(चांदई) येथील मिलिंद विद्यालयात जनाई बहुउद्देशीय संस्था चंडिकापूर चे अध्यक्ष प्रमोद धुरंधर यांच्या वाढदिवसानिमित्त  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए बी वानखडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जनाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रमोद धुरंधर, चंडिकापूर ग्रा पं चे माजी उपसरपंच चौरपगार ,माजी सरपंच तथा कृषि उत्पन्न बाजार समिती, दर्यापूरचे माजी संचालक राजूभाऊ धुरंदर  विचार पिठावर उपस्थित होते.

         विद्यालयातील बुद्ध विहारांमध्ये जाऊन तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करण्यात आले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. 

         मुख्याध्यापक  वानखडे यांनी प्रमोद धुरंधर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.  विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून मार्गक्रमण करावे. अथक परिश्रम केल्याने यश १००टक्के मिळते आणि आपण पाहिलेले स्वप्न १०० टक्के पूर्ण होतात असा विश्वास प्रमोद धुरंधर यांनी  व्यक्त केला.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक दिपक कावरे व संचालन व आभार प्रदर्शन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अमोल बोबडे यांनी केले. कार्यक्रमाला  विद्यालयातील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी दिपक कावरे, अमोल बोबडे ,पुरणप्रकाश लव्हाळे, मनिषा गावंडे ,संजय आठवले व विद्यार्थी उपस्थित होते.