ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- मागील सात वर्षापासुन आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायत स्थरावरील नरेगा अंतर्गत विविध प्रकारची बांधकामे करण्यात आली. तत्कालीन डेप्युटी इंजिनियर वडसा – देसाईगंज यांच्या कडून योग्य अहवाल अहवाल वरिष्ठाकडे न पाठविल्याने काम करून कुशल कामाची देय्यके सात वर्ष लोटुनहीं अजून पर्यंत मिळालेली नाहीत असा आरोप आमरण उपोषणकर्ते श्री संजय चरडूके व योगेंद्र सेलोते यांनी मंडपास भेट दिली असता बोलून दाखविले.
दि. 21-8-2024 पासून पासूण उपोष- णास प्रारंभ केला असुन आज उपोषणाच्चा दहावा दिवस आहे. येथिल बिडीओ मंगेश पि. आरेवार यानी अहवाल दुरुस्त करुण डेप्युटी सी ई ओ यांचेकडे पाठविला असल्याचे सांगितले. उपोषणकर्ते हे आमरण उपोषण करीत आहेत. मात्र बिडीओ यांच्या पत्रामधे बेमुदत उपोषण असा उल्लेख केलेला असल्याचे समजते.
माजी आमदार आनंदराव गेडाम,आमदार गजबे, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघेरे, राजकिय पक्षाच्या विविध पधाधी- यानी उपोषण मंडपास भेट दिली व प्रश्न मार्गी लावण्याचे शाब्दिक आश्वासन दिले. आज दहाव्या दिवसी उपोषण सुरू असून सेलोटे यांची प्रकृती खालावली उपचार केल्यानंतर पुन्हा सेलोटे उपोषण मंडपात उपस्थित झाले व पुन्हा उपोषणास बसले. मागणी पूर्ण झाल्या शिवाय आमरण उपोषण थांबविणार नसल्याचे मत उपोषण कर्त्यांनी सांगितले.