दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी व ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाचे अध्यापक हभप भागवत महाराज साळुंखे यांना एसफोर सोल्यूशन्सच्या माध्यमातून स्व.अनंत दत्तात्रेय कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ साहित्यरत्न पुरस्कार आध्यात्मिक गुरू विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे. मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल श्रीफळ हे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी महेश काकडे, मुकुंद संगोराम, हेमंत खिरे, डॉ. गौतम बेंगाळे, बीके शामल दीदी, मिलन म्हेत्रे, सुनील नाईक, गोविंद नामदे, डॉ.करण भिसे आदि मान्यवर उपस्थित होते.
भागवत महाराज साळुंखे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत साहीत्याचे अभ्यासक असून ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमात विद्यार्थ्यांना संत विचारांचा सोप्या रीतीने अर्थ सांगत आहे. त्यांचे विविध दिवाळी अंक आणि वृत्तपत्रांतून त्यांचे अनेक आध्यात्मिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे प्रापंचिकाचे अभंग रसिकांच्या विशेष पसंतीला उतरले आहेत.
साळुंखे यांना साहित्य रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर, संत ज्ञानेश्वर महाराज चरीत्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, सुभाष महाराज गेठे, उमेश महाराज बागडे, श्रीधर घुंडरे, पत्रकार विलास काटे, विठ्ठल शिंदे, महादेव पाखरे, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर आदींनी अभिनंदन केले.