सरकारच्या विरोधात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा व हल्लाबोल मोर्चा प्रचंड प्रमाणात यशस्वी.. — शेतकऱ्यांचा बैलबंडी, ट्रॅक्टर व पायदळ मोर्चा..

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर – तालुक्यात अतिवृष्टी होवून शेत पीके नष्ट झाली. अनेक कुंटूब बेघर होवून उद्धवस्त झाली. परंतू राज्यात असलेल महायुतीच सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. सरकारचे लक्ष वेदण्यासाठी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान व चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ.सतिश वारजूकर यांच्या नेतृत्वात शेतकरी शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी,”शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात, विवीध मागण्यासाठी बुधवारला दहा वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आंबोली चौरस्ता येथून तुकडोजी महाराजाच्या पुतळ्याचे पूजन करून शेतकरी न्याय यात्रेला सुरुवात करण्यात आली.

        ही न्याय यात्रा भिसी शहरातील महापुरुषाच्या पुतळ्याचे पूजन अभिवादन करून जांबुळघाट,नेरी मार्गे चिमूर पंचायत समिती कार्यालय समोरून श्रीहरी बालाजी देवस्थान येथे दिड वाजता पोहचली. 

      दरम्यान श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान ते चिमूर तहसिल कार्यालय पर्यंत शेतकऱ्यांचा बैलबंडी,ट्रॅक्टर व पायदळ मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. 

दरम्यान मान्यवरांनी उपस्थित शेतकरी मोर्चेकऱ्यांना संबोधीत केले. 

        अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी रुपरे 50 हजार तात्काळ मदत करावी,शेतकऱ्यांना पीक विमा तात्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करावी. 

     अतिवृष्टीमुळे घरे पडलेल्या कुटुंबांना तात्काळ घरकुल मंजूर करण्यात यावे,कृषी पंपांना रात्री मिळणारी वीज दिवस पाळी करून 24 तास पुरविण्यात यावी,शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेली प्रोत्साहनपर राशीचे 50 हजार रुपये देऊन 2 लाखाचेवर जुने कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे,घरगुती वीज वापरासाठी लावण्यात येणारे स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये,मोखाबर्डी उपसासिंचन योजनेचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे,रोजगार हमीच्या कामावर असलेल्या मजुरांचे व कुशल कामांचे पैसे तात्काळ देण्यात यावे,वन जमिनींचे पट्टे लाभार्थ्यांना लवकरात-लवकर देण्यात यावे,घरकुल योजनांचे पैसे जराही विलंब न करता लाभार्थ्यांना लवकर देण्यात यावे, अतिवृष्टीमुळे पडलेले घर व गुरांचे गोठे पीडित कुटुंबांना तात्काळ मदत करण्यात यावी,वाढविण्यात आलेली वीज दरवाढ मागे घेण्यात यावी,ताडोबा अभयारण्याला लागून असलेल्या शेतकऱ्यांना शेतमालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्याकरिता मागेल त्या शेतकऱ्याला सरसकट जाळीचे कुंपण मोफत पुरविण्यात यावे, वन जमिनीवरील शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही वन विभागाने त्वरित थांबवावी.

या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार दिनेश पवार मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,यांना निवेदन देण्यात आले.

      निवेदन देताना खासदार नामदेवराव किरसान,सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा माजी आमदार,अध्यक्ष खनिकर्म महामंडळ (राज्यमंत्री) दर्जा डॉ.अविनाश वारजूकर, सेवादल सहसचिव प्रा.राम राऊत,समन्वयक चिमूर विधानसभा काँग्रेस तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महासंघ डॉ सतिश वारजूकर,ओबीसी संघटक काँग्रेस धनराज मुंगले,माजी जि.प.सदस्य पंजाबराव गावडे,तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चिमूर डॉ.विजय गावडे,महासचिव जिल्हा काँग्रेस कमिटी गजानन बुटके,शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी चिमूर अविनाश अगडे,उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी चिमूर विवेक कापसे,महासचिव प्रदेश युवक काँग्रेस महाराष्ट्र साईश वारजूकर,काँग्रेस सेवादल किशोर शिंगरे,पप्पू शेख,आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यासह हजारो शेतकरी-शेतमजूर सहभागी झाले होते.