संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत
गाव स्तरीय समूह प्रशिक्षण कार्यक्रमाचे औचित्य.
शेती करताना जमीन जिवंत पाहिजे जमीन जिवंत नसेल तर शेतात कोणतेही पीक आपण घेतले तर चांगल्या प्रकारे होणार नाही. कारण जिवाणूच शेतीचा आत्मा आहे शेतात आपण अनेक खते टाकतो पण पिकाला पोहोचण्याचे काम हे फक्त जिवाणूच करू शकतात. शेतात जिवाणूची वाढ कशी होईल याच्यावर आधी शेतकऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे जिवाणू कल्चर बनवून शेतात जास्तीत जास्त वापर करून जिवाणूची संख्या वाढवावी जेणेकरून उत्पादनात वाढ होईल.
शेतात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॉपर,झिंक, सल्फर , इत्यादी तत्व कमी असेल तर बाजारातुन विकत आणून टाकु शकतो.पण शेतात कार्बन कमी असेल तर बाजारात विकत मिळत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात हिरवळीचे खत , शेणखत, लेंडी खत, गांडूळ खत, कोंबडी खत, शेतातील टाकाऊ अवशेषापासून S9 कल्चर प्रक्रिया करून कंपोस्ट खत व्यवस्थापन करून जमिनीत कार्बन वाढवण्यासाठी याचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतात करावे. असे ते बोलत होते.
मौजा विर्षी येथे परंपरागत कृषी विकास प्रकल्प अंतर्गत गाव स्तरीय समूह प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकल्प संचालक आत्मा उर्मिला चिखले, गायधने सर ,प्रमुख मार्गदर्शक शिवाजी भारती ,युवा शेतकरी पं.स.सदस्य अनिल किरणापुरे ,कृषी भूषण शेतकरी यादव मेश्राम ,मधुकर कापगते,मदन कापगते ,आत्मा व्यवस्थापक रजनीगंधा टेंभुर्णी, मास्टर टेंनर गजभिये सर ,अंतर्गत निरीक्षक नरेंद्र भांडारकर ,शैलेंद्र वाढई ,मिथुन गजभिये ,साक्षी कापगते, मिलिंद कापगते व परसोडी, लवारी, विर्षी आंमगाव/ बु.,एकोडी ,बापेंवाडा येथील सर्व शेतकरी गटातील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मदन कापगते,सूत्रसंचालन आभार मिलिंद कापगते यांनी केले.