रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
यावेळी ६५ विद्यार्थ्यांनी मनमोकळे पणाने प्रश्न विचारले.हसत खेळत,सविस्तर असे उत्तर आ.भांगडिया यांनी दिले.शिक्षण,आरोग्य,क्रीडा,सामाजिक क्षेत्रातील जनतेशी निगडित प्रश्न विचारण्यात आले.तब्बल चार तास विद्यार्थी बसून आमदाराना प्रश्न विचारत होते..
एका विद्यार्थीनीने आपले ड्रीम काय आहे? असा प्रश्न विचारला.तेव्हा आ.भांगडिया यांनी उत्तर देत सांगितले की प्रथम चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करणे,कांपा चिमूर – वरोरा – रेल्वे मार्ग,चिमूरला जलमार्ग हब हेच ड्रीम असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष घालून मोठे व्हावे अश्या शुभेच्छा दिल्या.मंचावर प्राचार्य निशिकांत मेहरकुरे उपस्थित होते.
यावेळी भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे,भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे,भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार,जेष्ठ नेते घनश्याम डुकरे,संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष संजय नवघडे,किशोर मुंगले,जयंत गौरकर,श्रेयस लाखे,अमित जुमडे,सचिन डाहुले,गोलू मालोदे आदी सह शिक्षक,विद्यार्थी कार्यक्रमाचे संचालन लोंढे तर आभार वाघधरे यांनी व्यक्त केले.