महिला अधिकार सामाजिक संघटनेच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी शीतल नागदेवे…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

भंडारा – येथे विश्रामगृहात महिला सामाजिक संघटनेची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत साकोली येथील सामाजिक कार्यकर्त्या शितल अतुल नागदेवे यांच्या विशेष कार्य बघून त्यांना महिला सामाजिक संघटनेतर्फे भंडारा जिल्हाध्यक्षपदी व विदर्भ कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

         याप्रसंगी नम्रता ताई बागडे महाराष्ट्र उपाध्यक्ष, विदर्भ उपाध्यक्ष वर्षा पाटील, विदर्भ कार्याध्यक्ष मनीषाताई भांडारकर ,विदर्भ अध्यक्ष नेहा साखरवाडे,प्रवक्ता शितल गेडाम, विदर्भ उपाध्यक्ष मनीषा खोब्रागडे यांच्या उपस्थितीत त्यांना जिल्हाध्यक्ष पदाचा प्रमाणपत्र देऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

          तिच्या नियुक्ती बद्दल प्रमिलाताई टेंभुरकर, स्वर्णमाला गजभिये, उत्तमा गडपायले,जिजा कोल्हे पौर्णिमा खांडेकर, अलका रामटेके,रत्ना खंडारे व इतर महिलांनी त्यांचे अभिनंदन केले.